देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी केल्याचा आरोप
गुगल टूल कीटचे महाराष्ट्र कनेक्शन
ग्रेटा थनबर्ग ट्वीटच्या तपासात बीडपर्यंत पोहोचले पोलीस
बीड । वार्ताहर
दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन सुरु झाल्यानंतर सोशल मीडियावर यासंदर्भात दोन्ही बाजुंनी प्रतिक्रिया येवू लागल्या. शेतकरी आंदोलनाला पाठींबा असणार्या प्रतिक्रिया मूळ बीडचा असलेल्या पण अमेरिकेत शिक्षण घेतलेल्या शंतनू शिवलाल मुळूक या तरुणाने शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवत सोशल मीडियावरील पोस्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण आणि शेतकरी या विषयावर काम करणार्या स्विडन देशातील ग्रेटा थनबर्ग या कार्यकर्तीच्या टिव्टरवर ट्विट केल्या. शंतनू मुळूकसह कर्नाटकमधील दिशा रवी व मुंबईची निकिता जेकब यांनी देखील सरकारच्याविरोधात असणार्या पोस्ट थनबर्गच्या ट्विटर हॅन्डलवर शेअर केल्या. ग्रेटा थनबर्गचे आंतरराष्ट्रीय पातळीवर लाखो,करोडो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तिच्या माध्यमातून या तिघांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी केली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून दिल्ली सायबर पोलीसांनी दोन दिवसांपूर्वीच बीडमध्ये येवून शंतनू मुळूकच्या घराचा पत्ता शोधून त्याच्या घराची झडती घेवून त्याच्या आई-वडिलांशी संवाद साधला. नंतर वडिलांना घेवून औरंगाबादमधील शंतनूचे बँक खातेही तपासले. आता या प्रकरणात शंतनू मात्र पोलीसांच्या संपर्कात आलेला नाही. पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले. ग्रेटा थनबर्गच्या मोहिमेत सहभागी होवून देशाची बदनामी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आल्याने बीड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनात हिंसाचार झाला आणि त्याची चौकशी करताना गुगल टूल कीट प्रकरण उघड झालं. आंतरराष्ट्रीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारं आणि नंतर डिलीट केलेलं ट्वीट आता तपासाच्या केंद्रस्थानी आहे. दिल्ली पोलिसांची विशेष टीम या गुगल टूल कीटमध्ये कुणी फेरफार केले आणि ते मुळात कुणी तयार केलं? देशविरोधी प्रचार मुद्दाम कुणी केला याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी रविवारी बंगळुरूची एक तरुण कार्यकर्ती पोलिसांच्या ताब्यात गेल्यानंतर आता याचं महाराष्ट्र कनेक्शनही उघड झालं आहे.
शंतनु मुळूक नावाचा एका तरुण कार्यकर्त्याचं नाव पोलिसांनी जाहीर केलं आहे. यानेच गुगल टूल कीट तयार केली आणि इतर दोघांनी ती एडिट केली, असा पोलिसांचा दावा आहे. टूल किट प्रकरणातील हा संशयित शंतनू मुळूक बीडचा रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. दिल्ली पोलिसांनी बीडमधील त्याच्या राहत्या घरी चौकशीही सुरू केली आहे. दरम्यान टूल किटचं प्रकरण समोर आलं आणि यामध्ये बीड शहरातील शंतनु शिवलाल मुळूक या तरुणावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आला. दिल्ली पोलिसांनी शंतनुच्या घराची झाडाझडती घेतली असून त्याच्या आई वडिलांची चौकशी केली. शंतनू अद्याप संपर्कात नाही. त्याच्या बँकेत जाऊन देखील खात्याचा तपशील पोलिसांनी घेतला आहे. कुटुंबीयांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत नाहक आमची बदनामी केली जात असल्याचा दावा केला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणूनच हा गुन्हा दाखल केला जात असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
बीड शहरातील चाणक्यपुरी भागात राहणार्या शिवलाल मुळूक यांचा मोठा मुलगा आहे. शंतनु हा इंजिनिअर आहे.बीई मॅकनिकल इंनिनिअरिग त्याने केलं आहे. शिवाय अमेरिकेत एमएसची पदवी घेतली असून तो पर्यावरण संवर्धना संदर्भात राष्ट्रीय पातळीवर काम करतो.शंतनूबद्दल बोलताना त्याची आई हेमलता मुळूक म्हणाल्या, शेतकर्यांसंदर्भात त्याला तळमळ आहे. म्हणून शेतकरी आंदोलनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून तो पाठिंबा देत होता. शंतनूचं आणि आमचं 8 दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं. पुन्हा बोलणं झालं नाही म्हणून चिंता वाटतेय.तर शंतनू हा इथेच राहतो औरंगाबादमध्ये जॉब करत होता. पुण्यात नव्याने काही सुरू करावे म्हणून गेला होता. आठ दिवसापूर्वी त्याच माझं बोलणं झालं त्यानंतर काहीच बोलत नाही झालं. दोन दिवसापासून दिल्ली पोलीसचे दोन अधिकारी आमची चौकशी करत आहेत. त्यांना आम्ही सहकार्य करत आहोत. शंतनू पर्यावरणासंदर्भात काम करतो. शेतकरी आंदोलनासंदर्भात माहिती विचारात होता. आत्ता कुठे माहिती नाही अशी माहिती शंतनूचे वडील शिवलाल मुळूक यांनी दिली.
शेतकरी आंदोलनासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमी, माहिती आणि लिंक एकत्रित करून टूल किट बनवली.आंदोलनाला साह्य व्हावे यासाठी कृषी कायदे व आंदोलनाची माहिती त्यात दिली जात होती इतर माहिती 16,17 जानेवारीला ते प्रकाशीत केले.शेतकरी आंदोलनाला जागतिक स्तरावरून पाठींबा मिळवण्यासाठीकाम केलं शँतनू आणि त्याचे सहकारी हे एकत्रित येऊन पर्यावरण वाचवणारी चळवळ पुढे नेत होतेशेतकरी आंदोलनाला जागतिक स्तरावर पाठींबा मिळवण्यासाठी यांनि ग्रेटा तणबर्ग चाविडिओ मागितला होता.. शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला म्हणून कारवाई करणं चुकीचं आहे. नाहक कुटुंबाची बदनामी केली जातेय असा आरोप शँतनूचे चुलतभाऊ सचिन मुळूक यांनी केला आहे शंतनूवर कारवाई केली जात आहे त्याचा निषेध शिवसेनेने केला आहे. तसेच काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी शंतनूला समर्थन दिले आहे.
टूल किट नेमके काय?
टुलकिट हे डिजीटल शस्त्रं आहे. याचा उपयोग आंदोलनाला सोशल मीडियावर हवा देण्यासाठी होतो. याच टूलकिटमधील माहिती ही खालिस्तानी समर्थक ’पोएटिक जस्टिस फाउंडेशन’ या गटाशी संबंधित असल्याचं पोलिंसाच्या प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झालं आहे. या किटमध्ये डिजिटल हल्ला करण्यासाठी योजलेल्या गोष्टींची यादी आणि संपूर्ण माहिती असते. दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू यांनी टूलकिट तयार केले आणि एडिट करण्यासाठी ते इतरांना शेअर केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आंतरराष्ट्रीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी भारत सरकारवर दबाव कसा आणता येईल, यासाठी तिने ट्विटद्वारे माहितीही दिली आहे. यासाठी तिने संपूर्ण नियोजनही ट्विटरवर शेअर केले होते, जे मोठ्या प्रचार मोहिमेशी संबंधित असून यामुळे देशाची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे.
आता पोलीसात घेतायेत शंतनूचा शोध
कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन भडकावणारे ’टुलकिट’ प्रसारीत केल्याच्या आरोपावरून बीडमधील शंतनू मुळूक नावाच्या तरूणाच्या शोधात दिल्ली सायबर पोलीस बीडमध्ये तळ ठोकून होते. परंतु त्यांना शंतनूचा शोध लागला नाही. मात्र पोलीसांनी त्याचे औरंगाबादमधील बँक खाते तपासल्याची माहिती समोर आली आहे.
Leave a comment