बीड । वार्ताहर
येथील राजस्थानी विद्यालयातील वरिष्ठ लिपीक संजयकुमार सोहनी यांची कन्या कु.सेजल सोहनी हिने नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या सी.ए.फाऊंडेशन परिक्षेत पहिल्या प्रयत्नातच घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सेजल सोहनी हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीड येथील द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालयात पुर्ण झाले. तिने बीड येथे राहुनच ऑनलाईन खासगी शिकवणी वर्ग पुर्ण केला. नोव्हेंबरमध्ये झालेल्या सी.ए.फाऊंडेशनच्या परिक्षेत तिने यश संपादन केले. कु.सेजलच्या या यशाबद्दल राजस्थानी सेवा समाजाचे अध्यक्ष ओमप्रकाश जाजू, सचिव रामेश्वर कासट, राजस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्रभाकरराव महाजन,माजी मुख्याध्यापक जगन्नाथ सोहनी, सेजलचे आजोबा माजी मुख्याध्यापक रामबिलास सोहनी, मुख्याध्यापक अंकुशे सर, द्वारकादास मुंदडा, संतोष सोहनी, गिरीश सोहनी, श्रीनिवास भुतडा, जयप्रकाश भुतडा, राजस्थानी विद्यालयाचे शिक्षक सचिन सोहनी, मुंदडा सर यांच्यासह महेश सेवा संघ, माहेश्वरी तहसील सभा व माहेश्वरी प्रगती मंडळाने अभिनंदन केले आहे.
Leave a comment