व्हिडीओने खळबळ;पोलीसांकडून शोध सुरु
बीड । वार्ताहर
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील सुर्यमंदिर संस्थानचे पुजारी असलेले हनुमान महाराज बेपत्ता झाले आहेत.दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली असून तेव्हांपासून ते बेपत्ता झाले आहेत.
कोळगाव येथील सूर्य मंदिराचे पुजारी असलेले हनुमान महाराज बेपत्ता झाल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला. रविवारी (दि.7) दुपारी त्यांची एक चिठ्ठी तसेच समाजमाध्यमावर व्हिडिओ समोर आला.‘काही जणांनी विनाकारण पैशासाठी, मला बदनाम करण्यासाठी माझ्या विरोधात पूर्व नियोजीत कट रचला,त्यामुळे मला आता जगण्याची इच्छा राहिली नाही’ असे त्यात म्हटले आहे. दरम्यान याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी तातडीने महाराजांचा शोध सुरु केला. रविवारी रात्रीपर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता.दरम्यान महाराजांच्या व्हिडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Leave a comment