पालकमंत्रीधनंजय मुंडे यांचे घाटनांदूर येथे प्रतिपादन

परळी -घाटनांदूर-पानगाव 85 कोटी रुपयांच्या 

 

32 किमीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

 

घाटनांदूर । गणेश चांगिरे

 

मी विधानसभेत जावे ही जनतेची मोठी इच्छा असल्यानेच मी विधानसभेत जावून मंत्री होऊ शकलो. रस्ते, नाल्याचे कामे करणे म्हणजे विकास नव्हे हे कामे करणे आमचे कर्तव्यच आहे. जनजीवन योजनेतून गावोगाव पाणी पुरवठा योजना राबविणार आहे. मतदार संघातील  जनतेचा दरडोई उत्पन्न दुप्पट करणे हे माझे उद्दिष्ट असून  आगामी काळात प्रयत्न करणार असून लवकरच घाटनांदूर परिसरात मोठया प्रकल्पांतर्गत  रोजगाराच्या संधी निर्माण करणार व अशा अनेक विविध विकास कामांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचा कायापालट करणार , कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे मागील एक वर्ष सगळ्यांच्याच आयुष्यात वाया गेले. आता हळू हळु विकासकामांना आपण वेग देत आहोत. येणार्‍या चार वर्षाच्या काळात या मतदारसंघाचा विकास करताना निधी बास असे म्हणायची वेळ या भागातील लोकांवर येईल असे काम करून दाखवू, असे प्रतिपादन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

 


 
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे परळी ते पानगाव या 32 किमी मार्गे परळी - चांदापुर - अंबलटेक - घाटनांदूर - पिंप्री - फावडेवाडी या  36.100 किमी. लांबीच्या 85 कोटी रुपयांच्या रस्ता  कामाचे भूमिपूजन शनिवारी (दि.6) धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.मागील 25 वर्षांच्या राजकीय प्रवासात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मी संघर्ष सहन केला, 2002 च्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते आजपर्यंत प्रत्येक वळणावर संघर्ष आणि षडयंत्र यांचा मला सामना करावा लागला, परंतु माझ्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्यातील एक सदस्य वाटतो, हे प्रेम आणि हा विश्वास मी कमावला ते इथल्या जनतेच्या बळावरच!यावेळी आ. संजय दौंड, सौ. शिवकन्याताई सिरसाट, अशोकराव डक, बजरंग बप्पा सोनवणे, राजकिशोर मोदी, राजेश्वर आबा चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, सा.बा. विभागाचे अभियंता श्री. पाटील यांनी या कामाची माहिती उपस्थितांना दिली तर गोविंद महाराज केंद्रे यांनी सूत्र संचलन केले. 

 

इथल्या मातीसाठी निस्वार्थपणे काम करणे हेच माझे उद्दिष्ट असून, रस्ते, नाल्या, वीज या मूलभूत सुविधा देणे हा विकास म्हणता येणार नाही, तो तर कर्तव्याचा भाग आहे. या भागातील लोकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी, इथला शेतकरी सधन व्हावा हे माझं या मतदारसंघासाठी पाहिलेलं स्वप्न आहे व ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असेही धनंजय मुंडे याप्रसंगी म्हणाले. यावेळी जि. प. अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, आ. संजय दौंड, मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, बजरंगबप्पा सोनवणे, राजकिशोर मोदी, सचिन मुळूक, बन्सी अण्णा सिरसाट, शिवाजी सिरसाट, गोविंद देशमुख, राजेश्वर चव्हाण, विलास बापू मोरे, राजपाल लोमटे, रणजित लोमटे, अजित देशमुख, ज्ञानोबा बप्पा जाधव, बाळासाहेब देशमुख, बालासाहेब शेप, ऍड. गोविंद फड, विष्णुपंत सोळुंके, बालाजी मुंडे, गणेश देशमुख, ह.भ.प. लालासाहेब पवार, विश्वंभर फड, शिवहार भताने, सत्यजित सिरसाट, बाळासाहेब गंगणे, आबासाहेब पांडे, तानाजी देशमुख, बालाजी राजमाने, शेख अय्युब, बंडू गित्ते, सभापती सौ. आलिशान पटेल, सुधाकर माले, सोपान तोंडे, रामभाऊ बडे, श्रीनिवास कराड, अर्जुन चाटे, बाळासाहेब डोंगरे, अरुण जगताप, प्रशांत जगताप, रखमाजी सावंत, सौ.मीनाताई भताने, अर्जुन वाघमारे, चंद्रकांत गायकवाड, पांडुरंग हरे, गजानन मुडेगावकर, बंडू गित्ते, गुणवंत आंधळे, चंद्रकांत वाकडे, हरिभाऊ वाकडे, ताराचंद शिंदे,चंद्रकांत चाटे,सोपान तोंडे, बाळासाहेब कातकडे, बालाजी डोंगरे, महादेव वाकडे, व्यंकटेश चामनर, वसंत देशमुख, काशिनाथ यादव, धनंजय शिंदे, सुंदर साळुंके, शरद शिंदे, राम गित्ते, सुधाकर शिनगारे, रामराव बडे, काशीनाथ यादव,दत्तात्रय गंगणे, शेख रौफ, शिवराम कराड, श्रीनिवास कराड, दामोदर कदम, मंगेश चव्हाण, बबन दौंड, महादेव लव्हारे, दत्ता यादव, जीवन यादव, विशाल चव्हाण, घाटनांदूरच्या सरपंच सौ. मंदाकिनी जाधव, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, माऊली जाधव, देविदास चाटे, महेबूब शेख, मुख्तार शेख, बन्सी जाधव, भास्कर जाधव, उमाकांत जाधव, सुरेश जाधव, उत्तम शिंगाडे, बाळासाहेब राजमाने, माऊली वैद्य, परमेश्वर कांबळे, मुस्ताक पटेल, बाबू शेख, आखतर जहागीरदार, महादेव अडसूळ, पिंटू पांचाळ, सज्जन दराडे, बबन मुंडे, नागनाथ महाराज आदी उपस्थित होते. 

मुंगीचा कारखाना या वर्षी सुरू होणार

या दोन वर्षात या भागात चांगला पाऊस झाला परंतु ऊस उत्पादक शेतकर्‍याला आपला ऊस गाळप होईल की नाही ही चिंता वाट्ते, शेतकर्‍यांनी चिंता करू नये, पुढील वर्षी एप्रिल महिन्यापासून आपला मुंगी येथील शिवपार्वती साखर कारखाना सुरू होणार असुन, त्यामुळे भागातील ऊसाला न्याय मिळेल असेही यावेळी बोलताना मुंडे म्हणाले.

रस्त्याचा दर्जा सांभाळा  

सदर रस्त्याचे काम बारामती येथील डीपीजे कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे असून, या कम्पनीने कामाचा दर्जा संभाळून जलद गतीने विहित वेळेच्या आत काम पूर्ण करावे यासाठी मुंडेंनी सूचना केल्या. हे रस्ते येणार्‍या काळात केवळ दळणवळण नव्हे तर औद्योगिक वाहतुकीसाठी वापरले जावेत या दृष्टीने आपण काम करत असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.