पाटोदा । वार्ताहर
केंद्र शासनाने पारीत केलेल्या सुधारीत कामगार कायद्यामध्ये ऊसतोड मजुरांच्या संदर्भातील कायद्याचा समावेश करावा या मागणीसाठी आ. सुरेश धस यांनी शुक्रवारी (दि.5) नवी दिल्ली येथे केंद्रिय कामगार मंत्री संतोष गंगवार यांची तसेच व कामगार व रोजगार मंत्रालयाच्या सचिव अपुर्व चंद्रा यांची भेट घेवुन विस्ताराने चर्चा केली.
केंद्र शासनाने जुन्या अस्तित्वात असलेल्या सर्व कामगार कायद्यामध्ये सुधारणा केलेली असुन सर्व कामगार कायदे हे चार विभागात केली गेली आहेत. त्यामधील सामाजिक सुरक्षा कायदा सन 2020 मध्ये ऊसतोड मजुरांचा समावेश करण्यात यावा. ऊसतोड मजुरांच्या विम्या संदर्भात आणि ऊसतोड मजुरांच्या उदभवणार्या प्रश्ना संदर्भात त्यांना न्यायिक आधिष्ठान मिळवुन द्यावे.या संदर्भात आ. सुरेश धस हे गेली वर्षभर महाराष्ट्र, कर्नाटक,गुजरात, आंध्रप्रदेश,ओरीसा इत्यादी राज्याच्या ऊसतोड मजुरांचा प्रश्न मांडत आहेत. शुक्रवारी आ.धस यांनी मंत्री संतोषजी गंगवार व सचिव अपुर्व चंद्रा यांची भेट घेवुन सकारात्मक चर्चा केली. आ.धस यांनी मांडलेले मुद्दे लक्षात घेवुन मंत्री गंगवार यांनी आ.धस यांनी तयार केलेला ऊसतोड मजुरांच्या कायद्यावर चर्चा करुन तो कायदा करण्यासाठी चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात आ.धस यांना नवीदिल्ली येथे आमंत्रीत केले आहे.
Leave a comment