संतांचे विचारही जगावे लागतात-पंकजाताई मुंडे

पाटोदा । वार्ताहर

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची परंपरा पुढे जोपासताना एक भक्त म्हणून दरवर्षी दर्शनासाठी येते, यात खंड पडू दिला नाही. संतांचे केवळ दर्शन पुरेसे नाही, त्यांचे विचारही जगावे लागतात अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी भाविक भक्तांना संबोधित केले.


वारकरी संप्रदायातील थोर संत वै. वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा शुक्रवारी (दि.5) लाखो भक्तांच्या उपस्थितीत गहिनीनाथ गडावर मोठया उत्साहात पार पडला, त्यावेळी भाविक भक्तांसमोर त्या बोलत होत्या. व्यासपीठावर येण्यापूर्वी पंकजाताई मुंडे व खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी संत वामनभाऊ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांनी त्यांचे स्वागत केले.गहिनीनाथ गड तमाम भाविकांचे श्रद्धास्थान आहे, कुठेही असो हा क्षण कधी चुकवू दिला नाही. तुमच्या सर्वांमध्ये मला वामनभाऊंचे दर्शन घडते म्हणून तुमच्या दर्शनासाठी मी इथं येते. पालकमंत्री असताना गडाच्या विकासाकरिता योगदान दिले, पुढेही देत राहू. आज देण्यासारखं काही नसलं तरी प्रेमाची देवाणघेवाण मात्र होत राहील असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या. संयम, क्षमाभाव आणि परोपकार ही संतांची शिकवण आत्मसात करण्याची खरी गरज आहे, त्यांच्या संघर्षाची ज्योत घेऊन पुढे चालायचे आहे. संत वामनभाऊंचे विचार दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणून कर्म केले तरच पुण्य लाभेल असे सांगून आपण मिळालेल्या संधीचं सोनं केल भविष्यातही करील असे सांगत जिल्हयाच्या विकासासाठी सत्ताधार्‍यांना शुभेच्छा दिल्या.

जेसीबीने झाली फुलांची उधळण


पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्यावर सर्व सामान्य जनता व कार्यकर्त्यांचे किती अलोट प्रेम आहे, याची प्रचिती आज दिसून आली. गहिनीनाथ गडावर आगमन झाल्यानंतर व्यासपीठाकडे जातांना कार्यकर्त्यांनी पंकजाताई मुंडे व खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्यावर जेसीबीने फुलांची उधळण करत जल्लोषात स्वागत केले. या स्वागताने मुंडे भगिनी भारावून गेल्या होत्या.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.