बीड तालुक्यात 89 सरपंचपदे महिलांसाठी आरक्षीत

बालकांच्या हस्ते चिठ्ठी काढून सोडत जाहिर

एससी-11, एसटी-1, नामाप्र-24 तर सर्वसाधारण

प्रवर्गातून 53 महिला सरपंच होणार

बीड । वार्ताहर

बीड तालुक्यात  सन 2020 ते 2025 या कालावधीत होणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच पदाचे आरक्षण गुरूवारी (दि.4) सकाळी तहसील कार्यालयाच्या सभागृहात जाहिर करण्यात आले. यात अनुसूचित जाती 11, एसटी 1 नामाप्र महिला 24 तर सर्वसाधारण प्रवर्गातून 53 अशा पद्धतीने एकुण 89 सरपंच पदे महिलांसाठी आरक्षीत झाली आहेत. तालुक्यातील एकूण 175 ग्रामपंचायतींपैकी 89 सरपंचपदे महिलांसाठी आरक्षीत आहेत. दरम्यान बीड तालुक्यात अनेक ठिकाणी सरपंचपदे आरक्षीत व महिलांसाठी जाहिर झाल्याने तालुक्यात कही खुशी तर कही गम असे चित्र पहायला मिळाले.
बीडचे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहात अथर्व संजय वाघुले, स्वराज्य दिपक बरडे या दोन मुलांच्या हाताने सोडत चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानुसार खालील प्रमाणे तालुक्यात सरपंच पदाचे आरक्षण जाहिर झाले.

गावनिहाय जाहीर झालेले आरक्षण पुढीलप्रमाणे आहे

सर्वसाधारण (पुरूष)- उमरद जहागिर/शहाबाजपुर, तांदळवाडी भिल्ल, आहेर चिंचोली, केतूरा, बहादरपुर, ईट/गंगनाथवाडी, कुक्कडगाव/खुंड्रस/चव्हाणवाडी, रंजेगाव, हिवरापहाडी, कुटेवाडी, जरूड, भवानवाडी, चाकरवाडी, खंडाळा, सानपवाडी/जैताळवाडी, लिंबागणेश, वानगाव, उमरद खालसा/उमरी, पांढर्‍याचीवाडी, पोखरीघाट, तिप्पटवाडी, नागझरी/मान्याचावाडा, कळसंबर(ब.), गुंधा, जिरेवाडी, मानेवाडी, म्हाळसापुर, आनंदवाडी, जेबापिंप्री, गवळवाडी, घाटजवळा/वलीपुर, आहेरवडगाव, खरड्याचीवाडी/तांदळ्याचीवाडी, बोरफडी/मोहिंगीरवाडी, रौळसगाव/गोगलवाडी, बाभूळवाडी/बेडकूचीवाडी/बेलवाडी, भंडारवाडी, भाळवणी/सुर्याचीवाडी/देवर्‍याचीवाडी, मुळूकवाडी, साक्षाळपिंप्री, नाळवंडी, वरवटी/आहेर धानोरा, चर्‍हाटा/जाधववाडी/मेेंगडेवाडी/धुमाळवाडी, तांदळवाडी, धनगरवाडी, रूईशाहजनपुर, काकडहिरा, बेलगाव, शिवणी, परभणी (केसापुरी), तांदळवाडी हवेली, पिंपळवाडी.
सर्वसाधारण (महिला)- मसेवाडी, मांडवखेल/आनंदवाडी/रत्नागिरी, अव्वलपुर/सोनगाव, मौजवाडी, कामखेडा, ढेकणमोहा, राजुरी (घोडका), नाथापुर, चौसाळा/धोत्रा, पिंपरगव्हाण, बोरदेवी/नबाबपुर, कदमवाडी, अंजनवती, काटवटवाडी, कारेगव्हाण, मोरगाव, वडगाव गुंधा, नांदुरहवेली/खामगाव/हिंगणी/पारगाव जप्ती, मानकुरवाडी, करचुंडी, पाली/कपीलधारवाडी, खडकी घाट/बावी/दहीवंडी, लोळदगाव/बेलापुरी, लोणीघाट, कुमशी, सुर्डीथोट, अंधापुरी घाट, माळापुरी, उदंडवडगाव, सांडरवण, अंबीलवडगाव, मन्यारवाडी, मंझेरी ह., वायभटवाडी, पिंपळनेर, कोल्हारवाडी, पोखरी मैंदा, कारळवाडी/निर्मळवाडी, बहिरवाडी, येळंबघाट, डोईफडवाडी/निवडूंगवाडी, देवीबाभूळगाव/चांदेगाव, पिंपळगाव मंझरा, रूद्रापुर, मांजरसुंबा/ससेवाडी, वडगाव क., तळेगाव, कानडीघाट, घोसापूरी, लक्ष्मीआईतांडा, धावज्याचीवाडी, मौज/ब्रम्हगाव.
अनुसुचित जाती (महिला)- खापरपांगरी, शहाजानपुर कामखेडा, सावरगाव घाट, नेकनूर/सावंतवाडी/वैतागवाडी, पेडगाव, कर्झणी, वांगी, हिंगणी खु्र., लिंबारूई मु., काळेगाव ह., ताडसोन्ना
अनुसुचित जाती (पुरूष)- पिंपळगाव मोची, बाळापुर, नागापुर बु., कुंभारी, सात्रा/चांदणी, नामलगाव/किन्हीपाई, घाटसावळी/बक्करवाडी, घारगाव/सुलतानपुर/वंजारवाडी, वंजारवाडी, इमामपुर. अनुसुचित जमाती (महिला)- बोरखेड/वडवाडी, अनुसुचित जमाती (पुरूष)- वासनवाडी. ना.मा.प्र. (महिला)- चिंचोली माळी/दहिफळ, बर्‍हाणपुर, अंथरवणपिंप्री/गणपुर, काठोडा, गुंधावाडी, बेलखंडी पाटोदा, वाढवणा, साखरे बोरगाव, ढेकणमोह तांडा, पिंपळगाव घाट, माळेवाडी घाट/ रूईगव्हाण, पालवण, पोथरा/मुर्शदपुर घाट, पाटोदा बे./कचरवाडी/दत्तनगर, जुजगव्हाण, कोळवाडी, राजुरी न., पारगाव सिरस, पिंपरनई/फुकेवाडी/चांभारमळई, सौंदाणा, सोमनाथवाडी, मैंदा, हिंगणी बु., अंथरवणपिंप्री तांड.
ना.मा.प्र.(पुरूष)- नागापुर खु., कुर्ला, खांडे पारगाव, आहेर निमगाव, गोलंग्री, लोणी शहाजानपुर/रामगाव, लिंबारूई देवी, पिंपळादेवी, पाटेगाव /मुगगाव, भाटसांगवी/औरंगपुर, वाकनाथपुर/राक्षसभुवन/रज्जाकपुर, कांबी, महाजनवाडी, समनापुर, मांडवजाळी, सफेपुर/गवारी/चौदसवाडी, बाभुळखुंटा, आडगाव/गुंजाळा, बेलूरा, शिदोड, पालसिंगन, मुर्शदपुर लिंबा, आंबेसावळी.

 

गेवराई तालुक्यातील 137 ग्रा.पं.

सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

पंडीतांची राजधानी सर्व साधारण महिलांसाठी राखीव

तलवडा व मादळमोही सर्वसाधारण

महिला उमापूर,गढी झाले ओपन

गेवराई । वार्ताहर

तालुक्यातील 137 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत सोमवार दि. 04 रोजी महात्मा फुले  सिटी सेंटर येथे जाहीर करण्यात आली असून , मतदारसंघाचे लक्ष लागलेली  दैठणची ग्रामपंचायत सर्व साधारण महीलेसाठी राखीव झाली असून, तलवडा व मादळमोही सर्व साधारण महीला तर उमापूर ,गढी झाले ओपन साठी जाहीर झाले असून,  पाहीजे तशी सोडत न सुटल्याने,  गुढघ्याला बाशिंग बांधून सोडत पहायला आलेल्या गाव पुढार्‍यांचा हिरमोड झाला आहे.
 गेवराई तालुक्यातील 137 ग्रामपंचायतचे आरक्षण सोमवार दि.4 रोजी दुपारी 3 वा. प्रभारी तहसीलदार सचिन खाडे यांच्या उपस्थितीत सदरील आरक्षण सोडत करण्यात आली. सर्वसाधारण प्रवर्गासाठी मालेगाव ( बु ), राहेरी, मांडुळा, खेर्डा ( बु ) , गढी, वंजारवाडी, मुळुकवाडी, डोईफोडवाडी, कुंभार वाडी, टाकळगव्हाण, पांढरी, संगम जळगाव, गोळेगाव, गो. पिंपळगाव, आगर नांदर, सिं. चिंचोली, उमापूर, भोगलगाव, खांडवी, राजापूर, शहाजानपूर चकला, धुमेगाव, टाकळगाव, सैदापूर, बागपिंपळगाव,  मारफळा, किनगाव, पाडळसिंगी, रूई, चो. वाडी, जयराम नाईक तांडा, खामगाव, भें. टाकळी, सिंदखेड, तळणेवाडी, गोंदी खू, रसुलाबाद, मनु. जवळा, पाथरवाला बु. , भें. खुर्द या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सर्व साधारण महीलांसाठी सिरसमार्ग, ताकडगाव, बाबुलतारा, ढालेगाव, गोविंद वाडी तहत तलवडा, मालेगाव,  वडगाव ढोक, त. बोरगाव, तळवट बोरगाव, दैठण ठाकर आडगाव कुम्भे जळगाव चोरपुरी चकलांबा, तांदळा बुद्रुक निपाणी जवळका, सावरगाव, पोखरी, तलवाडा , सेलू , बेबी नगर तांडा, भेंड बुद्रुक, मादळमोही, पांचाळेश्वर,  शेकटा, कांबी मजरा, सिरसदेवी , देव पिंपरी, नागझरी, मालेगाव खुर्द , वसंत नगर तांडा,  रोहितळ,  कोल्हेर,  बेलगाव,  हिंगणगाव,  गायकवाड , जळगाव, रांजणी, हिवरवाडी,  आंतरवाली,  रामपुरी, भडंग वाडीचा समावेश आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गात अर्धा पिंपरी, गुंतेगाव , पौळाची वाडी,  सावळेश्वर,  केकत पांगरी,  नांदलगाव,  पांढरवाडी , धानोरा गाव,  टाकळी,  रानमळा , काठोडा,  ईटकुर,  मिरगाव , बोरगाव थडी आणि मुधापुरी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.  नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी मन्यारवाडी, कट चिंचोली , धोंडराई,  पिंपळगाव कानडा,  धारवंटा,  अंतरवाली , बोरी पिंपळगाव , खळेगाव,  राज पिंपरी,  राक्षसभुवन गौंडगाव   सुरळेगाव , पोखरी   हिरापूर , अर्धमसला,  एरंडगाव,  तळेवाडी, मानमोडी , खेरडावाडी, तळवट,  बोरगाव , दैठण,  ठाकर आडगाव,  कुम्भेजळगाव,  चोरपुरी,  चकलांबा,  तांदळा बुद्रुक,  निपाणी जवळका,  सावरगाव,  पोखरी,  तलवाडा,  सेलू बेबी नगर तांडा,  भेंड बुद्रुक , मादळमोही , पांचाळेश्वर,  शेकटा , कांबी माजरा,  सिरसदेवी , देव पिंपरी,  नागझरी , मालेगाव खुर्द,  वसंत नगर तांडा,  रोहितळ , कोल्हेर,  बेलगाव , हिंगणगाव,  गायकवाड,  जळगाव,  रांजणी,  हिवरवाडी,  आंतरवाली,  रामपुरी, भडंग  वाडी, अनुसूचित जाती साठी पाचेगाव गंगावाडी, चव्हाणवाडी , वडगाव सुशी,  दिमाखवाडी,  वाहेगाव आम्ला,  काजळा , आहेर वाहेगाव ग्रामपंचायतीचा समावेश असून,  अनुसुचित जाती महीलांसाठी  भोजगाव , कोळगाव , सुशी ,  रेवकी,  बंगालीपिंपळा,  टाकळगव्हाण तरफ,   जवाहरवाडी,  मिरकाळा,  बोरगाव बुद्रुक, अनुसूचित जमाती साठी उक्कड पिंपरी व अनुसूचित जमाती महीलासांठी औरंगपूर कुकडा ग्रामपंचायत सरपंच पद राखीव झाली आहे.

केज तालुक्यातील 114 ग्रामपंचायत

 

सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत

केज । वार्ताहर

केज तालुक्यातील सन 2020 ते 2025 या कालावधीत होणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 114 सरपंच पदाची सोडत केज येथील तहसील कार्यालयात काढण्यात आली. 114 ग्रामपंचायतीच्या सरपंचापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे 7 डिसेंबर रोजीचे पूर्वीचे आरक्षण कायम ठेवून इतर मागास प्रवर्ग व  महिलांसाठी 83 पदे ही विविध प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.
केज तालुक्यात सन 2020 ते 2025 दरम्यान होणार्‍या ग्रामपंचतीच्या निवडणुकातील सरपंच पदांच्या आरक्षणनाची सोडत दि. 74 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वा केज तहसिल कार्यालयात तहसीलदार मेंढके यांच्या आदेशा नुसार काढण्यात आली. या वेळी प्रभारी तहसीलदार लक्ष्मण धस, नायब तहसीलदार सुहास हजारे, अव्वल कारकून पठाण, मन्मथ पटणे हे उपस्थित होते. अनुसूचित जातीच्या प्रर्वगासाठी पूर्वी 7 डिसेंबर रोजी काढलेली पूर्वीची एकूण 18 पदे व अनुसूचित जमातीसाठी 2 पदे आरक्षित झाली होती. ती अशी आहेत.
अनुसुचित जातींच्या महिलांसाठी जिवाचीवाडी, बोबडेवाडी, राजेगाव, सारणी (सांगवी), दरडवाडी, घाटेवाडी, काशीदवाडी, गप्पेवाडी/नामेवाडी, आंधळे तर अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या प्रवर्गासाठी दैठणा, लिंबाचीवाडी, जोला, डोणगाव, पिट्ठीघाट, सावळेश्वर, मुंडेवाडी, शिरपुरा सातेफळ आरक्षण पडले आहे.याशिवाय अनुसूचित जमातीच्या महिला करीता वरपगाव/कापरेवाडी तर अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या प्रर्वगासाठी रामेश्वरवाडी/ढाकणवाडी आरक्षित आहेत.नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आनेगाव, कोरडेवाडी, सांगवी-सारणी, सारुळ, सुर्डी, बेलगाव/केळगाव, देवगाव, जाधवजवळा, सोनिजवळा, धर्माळा, शिरुरघाट या ग्रा.पं.आरक्षीत झाल्या आहेत.

आष्टी तालुक्यात सरपंच पदांचे आरक्षण जाहीर

आष्टी । वार्ताहर

तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडतीनंतर आज गुरूवार (दि.4) येथील तहसील कार्यालयात दुपारी एक वाजता तहसिलदार राजाभाऊ कदम यांच्या अध्यक्षेतेखाली व आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत  जाहीर करण्यात आले.
तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय  आरक्षण पुढीलप्रमाणे अ.जा.पिंपरखेड, डोईठाण, खुंटेफळ(वा.),पारगाव (जो.), सुरुडी, वाहिरा. अ.जा. (महिला) -चिंचोली, गहुखेल, कर्‍हेवडगाव, कर्‍हेवाडी, केरूळ, सावरगाव घाट,वाळुंज. अ.ज.-चिखली. अ.ज. (महिला)- बळेवाडी,मांडवा.नामाप्र-बेलगाव, दौलावडगाव, डोंगरगण, गणगेवाडी, हनुमंतगाव, कापसी, लिंबोडी, निमगाव चोभा, पांगुळगव्हाण, पिंप्री घुमरी, सालेवडगाव, टाकळी आमिया, टाकळसिंग, हाकेवाडी, नागतळा, वंजारवाडी, खुंटेफळ पुंडी. नामाप्र (महिला)-आष्टा हरिनारायण, देवळाली, घोंगडेवाडी, हिवरा, जळगाव, कासारी, महिंदा, मंगरूळ, म्हसोबाचीवाडी, पांगरा, रुईनालकोल, साबलखेड, सराटेवडगाव, शेडाळा, शिरापूर, ठोंबळसांगवी, वटणवाडी. सर्वसाधारण- अंभोरा, बोरोडी, चिंचपूर, देसूर, देऊळगावघाट, कुंबेफळ, मोराळा, पांढरी, पाटसरा, पिंप्री आष्टी, सांगवी आष्टी, शेरीबुद्रुक, सुंबेवाडी, वेलतुरी, ब्रह्मगाव, चिंचाळा, दादेगाव, धनगरवाडी (डोईठाण), धनगरवाडी(पिंपळा), हाजीपूर, जामगाव, कानडी बुद्रुक, कानडी खुर्द, केळ, कोयाळ, मातकुळी, नांदा, निमगाव बोडखा, पिंपळगाव दाणी, पिंपळगाव घाट, पोखरी, सांगवी पाटण, शेरी खुर्द, शिराळ, सोलापुरवाडी, सुलेमान देवळा, तवलवाडी.सर्वसाधारण (महिला)-अरणविहिरा,फत्तेवडगाव, हातोळण, हिंगणी, केळसांगवी, खडकत, खरडगव्हाण, खिळद, किन्ही, पिंपळा, बांदखेल, बावी, बीडसांगवी, भाळवणी, भातोडी, दैठणा, देवीनिमगाव, धामणगाव, धानोरा, धिर्डी, घाटापिंप्री, हातोला, करंजी, कारखेल बुद्रुक, कारखेलखुर्द, कोहिनी, लमाणतांडा(वाटेफळ), लोणी(स.), मातावळी, नांदूर, पिंप्री घाटा, पुंडी, साकत, शेकापूर, उंदरखेल, वाघळुज, कडा, पारोडी असे आरक्षण सरपंच पदाचे जाहिर झाले असल्याची माहाती तहसिलदार राजाभाऊ कदम यांनी दिली आहे.

अंबाजोगाई तालुक्यात 51 सरपंचपदे महिलांसाठी आरक्षीत

एससी-16, एसटी-1, नामाप्र-27, सर्वसाधारण-55

सोडत जाहिर ; कही खुशी कही गम

अंबाजोगाई  । वार्ताहर

अंबाजोगाई तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण  गुरूवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या सभागृहात जाहिर करण्यात आले. यात एससी-16, एसटी-1 नामाप्र-27 तर सर्वसाधारण -55 अशा पद्धतीने सरपंच पदाचे आरक्षण जाहिर झाले.एकुण 99 ग्रामपंचायतीं पैकी 51 सरपंचपदे महिलांसाठी आरक्षीत आहेत.अंबाजोगाई तालुक्यात अनेक ठिकाणी सरपंचपदे आरक्षीत व महिलांसाठी जाहिर झाल्याने तालुक्यात कही खुशी तर कही गम असे वातावरण निर्माण झाले आहे.अंबाजोगाईचे तहसीलदार विपीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहात भिमसागर धम्मदीप जोगदंड (रा.धावडी वय 11 वर्षे) या मुलाच्या हाताने सोडत चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानुसार खालील प्रमाणे तालुक्यात सरपंच पदाचे आरक्षण जाहिर झाले.

अंबाजोगाई तालुक्यातील आरक्षण खालील प्रमाणे

सर्वसाधारण (पुरूष)- भतानवाडी, जवळगाव, चंदनवाडी, देवळा, धानोरा(ब्रु), तळणी, शेपवाडी, सोमनवाडी, दरडवाडी, बाभळगाव, सनगाव, पोखरी, घाटनांदुर, सोमनाथ बोरगाव, सोनवळा, कोदरी, गिरवली आपेट, मांडवा पठाण, राडी, मोरेवाडी, गिरवली बावणे, मगरवाडी/दस्तगीरवाडी, धावडी, सुगाव, तटबोरगाव, साळुंकवाडी. सर्वसाधारण (महिला)- बर्दापुर, हातोला, डोंगर पिंपळा, मुरंबी, दौठणा राडी, निरपणा, कुरणवाडी, उजणी, कोळकानडी, उमराई, साकुड, वरपगाव, वाघाळा-वाघाळवाडी, डिघोळअंबा, अंबलवाडी, श्रीपतरायवाडी, चनई, सेलुअंबा, माकेगाव, भारज, येल्डा, लोखंडी सावरगाव, पुस, तळेगाव घाट, अंजणपुर, राडीतांडा, नांदडी, भावठाणा.नागरीकांचा मागास प्रवर्ग (पुरूष)- पट्टीवडगाव, तेलघणा, गित्ता,ममदापुर (प), आपेगाव, चिचखंडी, हणुमंतवाडी, नांदगाव, वालेवाडी, कुंबेफळ, लिंबगाव, जोगाईवाडी/चर्तुवाडी, केंद्रेवाडी. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)- अकोला,कोपरा, ममदापुर(पा),बागझरी, काळवटी तांडा, पिंपरी,वरवटी, चौथेवाडी,वाकडी,पिंपळा धायगुडा, मुडेगाव,कातकरवाडी, राजेवाडी,पाटोदा(म).अनुसूचित जमाती (महिला)-तडोळा. अनुसूचित जाती (पुरूष)-राक्षसवाडी, हिवरा खुर्द,सौंदणा, सायगाव,जोडवाडी, मुरकुटवाडी, दगडवाडी,चोपनवाडी. अनुसूचित जाती (महिला)-धानोरा खुर्द, नवाबवाडी/घोलपवाडी,अंबलटेक,मुर्ती, दत्तपुर,खापरटोन, धसवाडी,कुसळवाडी.

वडवणी तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत आज जाहीर होणार

वडवणी  । वार्ताहर

वडवणी तालुक्यातील 35 पैकी 29 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत ही आज दि. 5 फेब्रुवारी 2021 रोजी तहसील कार्यालयाच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.
वडवणी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण  7 डिसेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आले होते. मात्र ग्रामविकास मंत्रालयाने ते आरक्षण रद्द केले होते. त्यामुळे आता नव्याने उद्या वडवणी तालुक्यातील 35 पैकी 29 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे. प्रत्यक्षात 4 फेब्रुवारी 2021 रोजी सदर आरक्षण सोडत होणार होती.परंतु माजलगाव तहसील कार्यालयाच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे वडवणी तहसील कार्यालयाचा पदभार असल्यामुळे एकाच दिवशी दोन्ही ठिकाणी तहसीलदार आवश्यक असल्याने ते शक्य नव्हते.याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वडवणी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण 5 फेब्रुवारी 2021 रोजी  घेण्यात येणार आहे. वडवणी तालुक्यातील 35 पैकी 29 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत ही उद्या होणार असुन 35 पैकी 06 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण एस्सी / एस.टी साठी राखून ठेवण्यात आलेले आहे. या 06 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षणामध्ये हरिश्चंद्र पिंप्री, चिंचवण, कुप्पा, काडीवडगाव बाहेगव्हाण, ढोरवाडी या सहा ग्रामपंचायत वगळून उर्वरित 29 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.