औरंगाबाद  । वार्ताहर

राजकीय भांडवल केले जाऊ नये. त्याचा त्यांच्यावर परिणाम होऊ नये याची माध्यमांनी काळजी घेतली पाहिजे, या शद्बांत पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावर बोलल्या आहेत. हा विषय मागे पडला आहे. नैतिक, सैद्धांतिक व कायदेशीर दृष्ट्या या गोष्टीचे कधीही समर्थन करू शकणार नाही. कोणीही असो मी राजकीय भांडवल केले नसते, असे मुंडे म्हणाल्या. औरंगाबादेत सोमवारी त्या बोलत होत्या. आरोप केलेल्या महिलेने धनंजय मुंडेंच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेतली आहे. 

पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी करु शकत नाही. पण कोणत्याही अशा गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला आणि ज्यांचा काही दोष नाही अशा कुटुंबातील लहान मुलांना त्रास होऊ शकतो”.

“मी महिला बालकल्याण मंत्री राहिली आहे. एक नातं आणि महिला म्हणून याकडे मी संवेदनशीलतेने पाहते. हा विषय कोणाचा जरी असता तरी मी त्याचं राजकीय भांडवलं केलं नसतं, आजही करणार नाही. संवेदनशीलता दाखवून मीडियाने त्यांच्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. भविष्यात यासंबंधी निकाल लागेलच,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

ओबीसीची जनगणना झाली पाहिजे 

“ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवळी मांडली. प्रीतम मुंडे यांनीदेखील संसदेत आवाज उठवला आहे. आता जनगणना होणार आहे, जनगणना होत असताना ती पाऊलं सकारात्मक पडली पाहिजेत. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. याच्यात प्रत्येत गोष्टी रडारवर येतील आणि स्पष्ट होतील. त्या समुदायाला न्याय देण्यासाठी मदत होईल,” असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे एकमेकांचे राजकीय स्पर्धक आहेत. परळीतील प्रत्येक स्थानिक निवडणुकीकडं या दोघांतील वर्चस्वाची लढाई म्हणून पाहिलं जातं. मागील विधानसभा निवडणुकीत धनंजय यांनी पकंजा यांचा मोठ्या फरकानं पराभव केला होता. या निवडणुकीत वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यामुळं त्यांच्या संबंधात कमालीची कटुता निर्माण झाली होती. मात्र, धनंजय मुंडे यांच्या आजारपणात पंकजा यांनी आस्थेनं त्यांची विचारपूस केली होती. त्यानंतर ही कटुता काहीशी कमी झाल्याचं बोललं जात होतं. त्या पार्श्वभूमीवर पंकजा यांची ही प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

म्हणून हिंदीत ट्विट केलं

“आता मी राष्ट्रीय स्तरावर काम करत असल्यानने माझ्या अनेक भूमिका, मुद्दे राष्ट्रीय स्तरावर नोंदवण्याची आवश्यकता असते. त्याच्यामुळे मी हिंदी भाषा वापरते, काल पहिल्यांदा वापरली नाही. जेव्हापासून मी राष्ट्रीय सचिव झाले तेव्हापासून बऱ्याच शुभेच्छा आणि मतं हिंदीत व्यक्त करत असते,” असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं.

तुम्ही ओबीसीच्या एकमेव मुख्यमंत्री होणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मला यापासून थोडं दूर ठेवा. कोणत्याही पदावर नसताना मला ही चळवळ लढायची आहे. माझ्यासाठी हे महत्वाचं ध्येय आहे. मुंडे साहेबांची एक अपूर्ण लढाई मी लढणार आहे”.

'मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले,

आंदोलनात राजकारण येऊ नये'

दिल्लीत गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू असून मुंबईतही हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला. विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले असून, सोमवारी जाहीर सभेने शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनासंदर्भात भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडेंना विचारलं असता, सकारात्मक चर्चेसाठी सरकार तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच, मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

मुंबईतील आझाद मैदानात होत असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. तर, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सांगलीतून ट्रॅक्टर मोर्चा काढून या आंदोलनात सहभागी होत आहेत. हजारो शेतकऱ्यांसह राज्यातील दिग्गज नेतेही आंदोलनात सहभागी होत आहेत. मात्र, भाजपाकडून या नेत्यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांचा सहभाग म्हणजे निव्वळ ढोंगीपणा असल्याचं म्हटलंय. आता, पंकजा मुंडेंनीही सावध पवित्रा घेत सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले.   

 

शेतकरी आंदोलनाबाबत पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलं असता, केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतले आहेत आणि आताही सरकार शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी दाखवत आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. हा बळीराजाचा देश आहे, मोदींनी पीक विम्याचा, हमीभाव, शेतकऱ्यांना पेन्शन द्यायचा असे महत्त्वाचे निर्णय घेतले. सरकार सकारात्मक चर्चेसाठी तयार आहे. दोन्ही बाजूंनी सकारात्म चर्चा झाल्यास नक्कीच तोडगा निघेल. महाराष्ट्रात आंदोलन पोहोचायला तीन महिने का लागले, हा साधा प्रश्न आहे. शेतकरी बाजूला न राहता या आंदोलनात राजकारण येऊ नये, हा प्रयत्न सर्वांचाच असला पाहिजे, असेही पंकजा यांनी म्हटले. 

ओबीसीचा मुख्यमंत्री?

जालना येथे रविवारी ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा पार पडला होता. यात पुढचा मुख्यमंत्री ओबीसी समाजाचाच होणार असा बॅनर दिसला होता. याबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सावध पवित्रा घेतला.  "मला याच्यापासून थोडं मुक्त ठेवा. आता ही चळवळ मला कुठल्याही पदावर नसताना लढायची आहे आणि ते माझ्यासाठी जीवनातील एक महत्वाचं ध्येय आहे. मुंडे साहेबांची ती एक अधुरी लढाई आहे ती पूर्ण करायची आहे", असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.