पुरस्कारात विजय हमीने, उत्तम हजारे, अभिमन्यू घरत,

उदय नागरगोजे, उमेश जेथलिया व मनोज गव्हाणे यांचा समावेश

केज । वार्ताहर
पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम एक पत्रकार करत असतो, ही बाब लक्षात घेता केज येथील आदर्श पत्रकार संघाने बीड जिल्ह्यातील प्रतीवर्षीप्रमाणे याही वर्षी काही निवडक पत्रकारांना पुरस्काराच्या रूपाने सन्मानित करण्याचे आयोजन केले आहे.


प्रतिवर्षी प्रमाणे जानेवारी महिन्यात दर्पणदिन व मुकनायक दिनाचे औचित्य साधून आदर्श पत्रकार समिती केजच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रातील विशेष आणि उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्या जाणार्‍या पुरस्काराची घोषणा आदर्श पत्रकार समितीच्या वतीने करण्यात आली आहे.यामध्ये विजय हमीने, उत्तम हजारे, अभिमन्यू घरत, उदय नागरगोजे, उमेश जेथलिया व मनोज गव्हाणे यांचा समावेश असून हे पुरस्कार मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दिले जाणार आहेत. तसेच कोरोना महामारीच्या काळात ज्यांनी स्वतःच्या जिवाची देखील तमा न बाळगता चाकोरी बाहेर जाऊन जोखमीचे कार्य केले त्या बद्दल तहसीदार दुलाजी मेंढके आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांना विशेष आदर्श सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणार्‍या केज तालुका आदर्श पत्रकार समितीच्या वतीने दि 31 जानेवारी रोजी दर्पण दिन आणि मुकनायक दिन या निमित्त पत्रकारिता क्षेत्रात विशेष व गौरवास्पद कायमगिरी करणार्‍या पत्रकारांचा मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख व सामाजिक क्षेत्रातील गौतम खटोड, उपजिल्हाधिकारी शरद झाडके व अँड. देशमुख,राजकीय व शासकीय पदाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.पत्रकारिता क्षेत्रात अत्यंत सचोटीने आणि स्वतःचे मोठेपण पत्रकारीता करणारे विजय हमीने यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे.तसेच दै. लोकशाचे निवासी संपादक उत्तम हजारे हे पत्रकारिता क्षेत्रात एक अभ्यासू आणि जेष्ठ पत्रकार आहेत त्यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे. दै हिंदजागृतीचे संपादक अभिमन्यू घरत यांना आदर्श संपादक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. दै. लोकप्रश्नचे उमेश जेथलिया यांना दिवंगत मोहन भोसले  स्मृती निर्भीड पत्रकारिता पुरस्कार आणि दिवंगत सुनील देशमुख स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार दै. पुढारीचे नेकनूर तालुका प्रतिनिधी मनोज गव्हाणे यांना देण्यात येणार आहे. तसेच कोरोना कालावधी मध्ये विशेष कामगिरी करणारे केजचे तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी  कोरोनाच्या संकटकाळी तालुक्यातील नागरिकांना जाग्रत करून संसर्ग कमी  नागरिकांना संसर्ग होऊ नये म्हणून अहोरात्र रस्त्यावर उतरून काम केले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ विकास आठवले यांचे कार्यही उल्लेखनिय असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना केअर सेंटर केज येथील रुग्ण बरे होण्याचा दर समाधानकारक राहिला. म्हणून त्यांनाही आदर्श सेवा पुरस्कार दिला जाणार  आहे.या पुरस्कार सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयजी आरकडे (सर) यांनी दिली आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.