मुंबई | प्रतिनिधी
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात आता भाजप आणि मनसे पदाधिकारी यांच्यासह मुंडे यांच्या नातेवाईकांनी ही तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनीही तक्रार दाखल केली आहे. 2019 पासून आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं केंद्रे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
ब्लॅकमेल करणे, त्रास देणे अशा प्रकारचा त्रास रेणू शर्मा यांच्याकडून दिला जात होता, असं केंद्रे यांनी अपल्या तक्रारीत म्हटलं आहे. पुरुषोत्तम केंद्रे यांनी रेणू शर्मा यांच्याविरोधात तक्रार नोव्हेंबरमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
मी एकटी विरुद्ध महाराष्ट्र असं चित्र निर्माण झालंय' -रेणू शर्मा
रेणू शर्माने ट्विट केले आहे की, ‘या प्रकरणात मी माघार घेते हीच तुमच्या सर्वांची इच्छा आहे. माझ्याबाबत सर्व मिळून जे आरोप करत आहे ते चुकीचे आहेत. माझ्यावर जे आरोप केले जात आहे ते यापूर्वी का करीत नव्हते. मी माघार घेत असले तरी मला माझा गर्व आहे. तुम्हाला माझ्या बद्दल कितीही आरोप करायचे आहे करा असं म्हणत रेणू शर्माने देव तुमचं भलं करो अशा आशयाचे ट्विट केले आहे.
ट्वीटमध्ये महिलेनं म्हटलं आहे की, "मी खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी एवढ्या लोकांना एकत्र यावं लागतंय. मी एकटी विरुद्ध महाराष्ट्र असं चित्र निर्माण झालंय. तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहित बसा. जर मी चुकीची होते तर एवढे दिवसांत माझ्याविरोधात तक्रार का केली नाही? मला पाठीमागे हटावं लागलं तरी मला गर्व आहे की, मी एकटी लढले."
Leave a comment