मुंबई | प्रतिनिधी
ठळक मुद्देपोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने ही माहिती दिली आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट करत मदतीची साद घातली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने ही माहिती दिली आहे. याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहे. १० तारखेला याबाबतची तक्रार दिली. ११ तारखेला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्विकारण्यात आला आहे.
२००६ पासून अत्याचार सुरु होते. पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तसेच याचे व्हिडीओ काढून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट करत मदतीची साद घातली आहे. या प्रकारामुळे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले असून राज्यात खळबळ माजली आहे,दरम्यान धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे
. या प्रकारामुळे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले असून राज्यात खळबळ माजली आहे,दरम्यान धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे
Leave a comment