भंडारा
राज्याला हादरवणारी घटना भंडाऱ्यात घडली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात आग लागली. या आगीतून ७ बालकांना वाचवण्यात आलं आहे. पण १० बालकांचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री २ वाजता ही आग लागली. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या आऊटबोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं समोर आलं. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या नर्सने दरवाजा उघडून पाहिला असता खोलीत मोठ्या प्रमाणात धूर झाला होता.
अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आलं. या आगीत आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेली सात बालकं वाचवण्यात आली. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० बालकांचा मृत्यू झाला.भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. राज्यमंत्र्यांना तातडीने भंडाऱ्यात जाण्याचे आदेश राजेश टोपे यांनी दिले आहेत. कोणत्याही हलगर्जीपणावर कठोर कारवाई होईल असं आरोग्यमंत्र्यांनी बोलताना म्हटलं आहे.
भंडारा येथील नवजात अर्भकांच्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी
मृत बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत
येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी असून कुटुबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही श्री. टोपे यांनी सांगितले.
याप्रकरणाची सखोल चौकशी करतानाच दोषींवर कठोर करवाई केली जाईल आणि आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल,असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. रात्री ड्युटीवर असलेल्या नर्स व वॉर्ड बॉय यांनी तातडीने खिडक्या, दरवाजे उघडली. या कक्षाच्या लगतच्या दुसऱ्या वॉर्डमधील बालकांना त्यांनी तातडीने हलविल्याने ७ बालकांना वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेमुळे १० बालकांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघांचा आगीत होरपळून तर अन्य सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला आहे.
याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही यासाठी दक्षता घेतली जाईल, असेही आरोग्यमंत्रांनी स्पष्ट केले आहे.
भंडारा रुग्णालय दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई;
सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडीट करण्याचे निर्देश
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनीटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राहुल गांधी हळहळले, उद्धव ठाकरेंकडे केली मागणी
नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातआग लागल्यामुळे गुदमरुन 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसंच मृत बाळांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत करावी, अशी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.
भंडारा सामान्य रुग्णालयात मध्यरात्री आग लागली होती. आगीमुळे नवजात शिशु केअर यूनिट SNIC मधील 17 नवजात बाळांपैकी 10 जणांचा गुदमरून करुण अंत झाला. या घटनेमुळे महाराष्ट्रासह देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही भंडारा रुग्णालयातील दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. 'महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात आग लागल्याची दुर्दैवी घटना अत्यंत वेदनादायी आहे. जीव गमावलेल्या बाळांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो' अशी भावना राहुल गांधी यांनी ट्वीट करून व्यक्त केली.
भंडा-यातील घटनेने मन सुन्न झाले
; सरकारने प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी - पंकजाताई मुंडे
भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवात नवजात शिशूंच्या मृत्यूने मन सुन्न झाले, सरकारने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.
यासंदर्भात एक ट्विट करून पंकजाताई मुंडे यांनी नवजात बालकांच्या कुटुंबियांविषयी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत. "भंडा-यातील अग्नितांडवात नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने मन सुन्न झाले. या घटनेने चिमुकल्यांच्या माता पित्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या कुटंबियांप्रति मी शोक व्यक्त करते. सरकारने या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी" असे ट्विट त्यांनी केले आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधानही हळहळले; मुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश
संपूर्ण देशाचं मन हेलावणारी घटना महाराष्ट्रातील (Bhandara) भंडारा येथे घडली. मध्यरात्री भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. ज्यानंतर एकच आक्रोश या परिसरात पाहायला मिळाला.
रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळंच ही घटना घडल्याचे गंभीर आरोप मृत बालकांच्या नातेवाईकांनी केले. प्रशासकीय यंत्रणांनीही या घटनेची दखल घेत खुद्द राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घटनेचा आढावा घेतला आहे. राज्य शासनाकडून या घटनेच्या तात्काळ चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.
इथं राज्यातील नेतेमंडळींनी भंडारा दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिलेल्या असतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हळहळ व्यक्त केली.
भंडारा जिल्हा रुग्णालय आगीप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद साधून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले.
भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनीटला आग लागून बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारनं याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मी भंडारा पोलिसांना दिले आहेत. आज मी स्वतः घटनास्थळी भेट देणार आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे.
या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी!
दरम्यान, सत्यजीत तांबे यांनी ट्विट करत महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला. 'भंडारा जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या विभागाला लागलेल्या आगीत १० लहान बालकांच्या मृत्युच्या घटेनेने आजच्या दिवसाची सुरुवातचं दुःखाने झाली. 'शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांच्या बाबतीत कुठलेही नियम अगदी कडक शिस्तीने पाळले पाहीजेत असे माझे ठाम मत आहे', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या विभागाला लागलेल्या आगीत १० लहान बालकांच्या मृत्युच्या घटेनेने आजच्या दिवसाची सुरुवातचं दुःखाने झाली.
शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांच्या बाबतीत कुठलेही नियम अगदी कडक शिस्तीने पाळले पाहीजेत असे माझे ठाम मत आहे.
तेव्हा आता सक्तीच्या चौकशीच्या आदेशानंतर या प्रकरणी नेमकं कोणाला दोषी ठरवण्यात येतं आणि कोणावर कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Leave a comment