बीड | वार्ताहर
येथील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या प्रांगणात एका तरुणाने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. सोमवारी (दि.4) दुपारी 1 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे कार्यालयातील कर्मचार्यांची धांदल उडाली. तातडीने संबंधित तरुणाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलीसांच्या माहितीनुसार, इम्तियाज अमिन कुरेशी (30, रा.गेवराई) असे विषारी द्रव प्राशन केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने विष का घेतले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतू इम्तियाज व त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद असून हे प्रकरण पोलीस अधिक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण कक्षात दाखल आहे. या ठिकाणी दोघांचेही समुपदेशन सुरु आहे. सोमवारी या प्रकरणात तिसर्यांदा सुनावणी सुरु करण्यात आली होती. इम्तियाज व त्याची पत्नी सुनावणीला हजर होते. याच दरम्यान त्याने कार्यालयाबाहेर येवुन विषारी द्रव प्राशन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले.
Leave a comment