केवळ दिल्लीच नाही तर देशातील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस मोफत दिली जाईल

पोलिओ लसीकरणाच्या वेळी सुद्धा अफवा पसरल्या होत्या, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका

नवी दिल्ली -

 भारतात कोरोना लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे आजपासून ड्राय रन सुरू होत असतानाच  पत्रकारांशी संवाद साधताना केवळ दिल्लीतच नव्हे, तर संपूर्ण देशात कोरोना लस मोफत दिली जाणार असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले आहे.

नववर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोना संदर्भात सरकार देशवासियांना दिलासा देणारे निर्णय घेत आहे. शुक्रवारी पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूट आणि ऑक्सफर्डमार्फत तयार करण्यात आलेल्या कोविशिल्डला लसीला पहिल्या टप्प्यातील परवानगी मिळाली आहे. तसेच आजपासून देशभरात लसीकरणाच्या ड्राय रनला देखील सुरुवात झाली आहे. आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोना संदर्भात आनंदाची बातमी दिली आहे. आता दिल्लीतच नव्हे, तर संपूर्ण देशात कोरोना लस मोफत मिळणार असल्याचं हर्ष वर्धन यांनी जाहीर केलं आहे.

सीरम इंस्टिट्यूटच्या लसीला मान्यता दिल्यानंतर लसीची किंमत किती असणार याकडे सर्वांचं लक्षण होतं. पण या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी स्वतः दिलं आहे. कोरोना लस ज्याप्रमाणे दिल्लीत मोफत मिळणार आहे, त्याप्रमाणे सर्व राज्यात मोफत मिळणार आहे का? हा प्रश्न प्रसारमाध्यमांनी हर्ष वर्धन यांना विचारल्यावर ते म्हणाले की, ‘कोरोना लस फक्त दिल्लीत नाही, तर संपूर्ण देशात मोफत मिळणार आहे.’

दरम्यान आजपासून प्रत्येक राज्यातील काही शहरांमध्ये लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी हॉस्पिटलची पाहणी करून ड्राय रनचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, ‘कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये, असे मी देशातील नागरिकांना आवाहन करतो. सुरक्षितता आणि लसीची कार्यक्षमतेची तपासणी करणे, याला आमचे प्राधान्य आहे. दरम्यान पोलिओ लसीकरणाच्या वेळी अनेक अफावा पसरल्या होत्या. पण लोकांनी अफवांकडे दुर्लक्ष करून पोलिओची लस घेतली आणि भारत पोलिओमुक्त झाला.’

पहिल्या टप्प्यात ३ कोटी कोविड योद्ध्यांना मोफत लस मिळणार

कोरोनाच्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १ कोटी आरोग्यसेवक, २ कोटी इतर कोविड योद्ध्यांना मोफत लस दिली जाणार आहे. संपूर्ण देशात मोफत लस देण्याचं विधान केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

देशवासियांना केलं आवाहन

“देशातील नागरिकांना मी आवाहन करतो की, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. सुरक्षितता आणि लसीची कार्यक्षमता याची खात्री करणे, याला आमचं प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळीही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, परंतु लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला आहे,” असं सांगत आरोग्यमंत्र्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं.

 

 

 

कोरोना लसीकरणासाठी राज्य सज्ज - राजेश टोपे

 

दरम्यान, कोरोना लसीकरणासाठी राज्य सज्ज असून प्रशासणाची तयारी बघण्यासाठी आजची रंगीत तालीम होती असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. सिरम लस  देण्यासाठी राज्य तयार असून त्यासाठी ड्रग अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या परवानगीची गरज आहे ही परवानगी मिळाल्यास प्रशासन लसीकरणासाठी सज्ज असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. लसीकरण झाल्यानंतर पेशंटला काही त्रास होतो का काही अडथळे येतात का त्यासाठी आज रंगीत तालीम झाल्याचं देखील टोपे यांनी म्हटले.8 कंपन्या पैकी 2 कंपन्यांच्या वॅक्सिन तयार असून ड्रग अँथोरिटीची परवानगी मिळणं गरजेची आहे असंही टोपे म्हणाले

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.