ग्रामपंचायतींसाठी जिल्ह्यात 36 उमेदवारांचे अर्ज बाद
बीड । वार्ताहर
जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होत आहे. 31 डिसेंबरला दाखल झालेल्या सर्व अर्जाची छानणी निवडणुक विभागाकडून करण्यात आली . या छानणीमध्ये जिल्ह्यातील 36 इच्छुकांचे अर्ज बाद ठरवण्यात आले तर आता 3535 उमेदवारांचे 3606 अर्ज निवडणूक विभागाने वैध ठरवले आहेत.
डिसेंबरमध्ये मुदत संपणार्या जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला असून 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत इच्छुकांना आपले अर्ज निवडणुक विभागाकडे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती.30 डिसेंबर अखेर जिल्ह्यात एकूण 3642 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या अर्जांची गुरूवारी म्हणजेच 31 डिसेंबरला छानणी करण्यात आली यात 36 अर्ज अवैध ठरवण्यात आले. यामध्ये सर्वाधिक 12 अवैध अर्ज आष्टी तालुक्यात ठरले आहेत. या पाठोपाठ बीड तालुक्यात 4, परळी 1, माजलगाव 2, गेवराई 5, धारूर 6, केज 3, पाटोदा 2, तर शिरूर कासार तालुक्यात 1 का उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. म्हत्वाचे हे की अंबाजोगाई तालुक्यात 7 ग्रामपंचायतीची निवड होत असून या ठिकाणी एकही अर्ज अवैध ठरला नाही तसेच वडवणी तालुक्यातही सर्व 86 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. आता जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींच्या 413 प्रभांगासाठी 3535 उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत असे असले तरी येत्या 4 जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे यापैकी किती जण निवडणुकीतुन माघार घेतात यावर निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. शिवाय याच दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहेत अशी माहिती निवडणुक विभागाने दिली.
Leave a comment