बीड बाजार समितीची कार्यवाही
बीड । वार्ताहर
बीड तालुक्यातील अवैधरित्या, व्यापार, व्यवहार करणार्यांवर बाजार समितीने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बाजार समितीचे अपरोक्ष अवैध मार्गाने कापुस खरेदी करणार्या श्री सद्गुरु जिनिंग (ईट) येथील व्यापार्यास 1 लक्ष रू. दंडाची कार्यवाही बीड बाजार समितीकडून केली आहे.
बाजार समितीच्या नियमांनुसार कृषी मालाचे व्यापार करणारे व्यापारी यांनी परवाना घेणे व परवाना नियमातील अटी, शर्ती, तरतुदी नुसार फी भरणा करणे आवश्यक आहे. परंतु बीड तालुक्यातील एक बडे जिनींगचे व्यापारी यांनी बाजार समितीला माहिती न होवू देता 1900 क्विंटल कापुस खरेदी केली त्याची माहिती कळताच तातडीने पंचनामा करून परवाना निलंबनाची कार्यवाही केली अशा अवैध कृषी माल खरेदी प्रकरणी नियमांनुसार पाचपट पर्यंत दंडाच्या कार्यवाही प्राप्त अधिकारात बाजार समितीकडून सक्तीची कार्यवाही केली परंतु सदर व्यापार्यांने चौकशी, कारवाईच्या वेळी केलेली सहकार्य व पहिलीच चुक विचारात घेऊन चुकविलेली फी व तेवढीच दंड म्हणुन रू.1 लक्ष दंड वसुलीच्या सक्तीच्या कार्यवाहीमुळे जिनींग प्रेसिंगवर कापुस खरेदी करणारे व्यापार्याचे धाबे दणाणले आहे.
Leave a comment