आता राम मंदिरासाठी बलिदानाची नाही तर दानाची गरज असल्याचं स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी यावेळी सांगितलं.
अयोध्या --
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराचे कार्य गतीमान सुरू आहे. राम मंदिर लोक सहभागातूनच उभारण्यात येत आहे. एक बड्या उद्योगपतीची ऑफर देखील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा नाकारल्याची माहिती रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी परिषदेत दिली.
राम मंदिरांच्या देगणीसाठी 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत देशभर अभियान राबवण्यात येणार आहे. 15 जानेवारीनंतर पश्चिम महाराष्ट्रातील 10 हजार गावं, 50 लाख कुटुंबापर्यंत रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे स्वयंसेवक पोहोचतील. समर्पणाचे आवाहन करतील. आता राम मंदिरासाठी बलिदानाची नाही तर दानाची गरज असल्याचं स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी यावेळी सांगितलं.
विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर, रा.स्व. संघ प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, प्रांत अभियान प्रमुख संजय मुदराळे, प्रांत अभियान सहप्रमुख मिलींद देशपांडे, पुणे महानगर अभियान सहप्रमुख महेश पोहनेरकर यावेळी उपस्थित होते.
स्वामी गोविंद देवगिरी महाराज म्हणाले, राम मंदिरामुळे संपूर्ण अयोध्या नगरीचे रूप बदलणार आहे. वैदिक सिटी म्हणून अयोध्येला नवी ओळख मिळणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यासाठी परिश्रम घेत आहेत. राम मंदिरला अनुसरून संपूर्ण अयोध्या नगरीचं रुप बदलणार आहे.
1000 वर्षे टिकेल असं मंदिर उभारणार...
राम जन्मभूमी परिसरात 200 फूटापर्यंत वाळू असल्यानं 1000 वर्षे टिकेल असं मंदिर कसं उभारण्यात येईल, यावर देशातील सर्व IIT मधील तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली आहे. मंदिर 1000 वर्षे टिकेल असंच उभारण्यात येईल, असा निर्वाळा तज्ज्ञांच्या चर्चेतून झाल्याचं स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी सांगितलं.
मुख्य मंदिरासाठी एकूण 300 कोटी खर्च तर संपूर्ण परिसर विकास धरुन 1100 कोटी खर्च अपेक्षीत आहे. मुख्य मंदिराबाहेर संपादित केल्या जाणाऱ्या 108 एकर जागेचा विकास करण्यासाठी एका उद्योगपतीकडून ऑफर मिळाली होती. मात्र नाकरण्यात आल्याचं स्वामींनी सांगितल. विशेष म्हणजे मंदिरासाठी केंद्र सरकार कसलीही आर्थिक मदत करणार नाही आहे. मंदिर हे लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे.
1000,100,10 रुपयांची कुपन्स
15 जानेवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत देशभरात राम मंदिरासाठी देणगी अभियान राबवण्यात येणार आहेत. त्यात दीड लाख स्वयंसेवक सहभागी होतील. 1000 ,100,10 रुपयांची कुपन्स असतील. 14 जानेवारीच्या आधी आणि 1 मार्चनंतर जर कुपन मिळालं तर ते डुप्लिकेट समजावं, असं आवाहन देखील स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी यावेळी सांगितलं.
निधी संकलनाच्या दुसऱ्या दिवशीच पैसे बँकेत भरले जाणार आहेत. निधीचा गैरवापर होऊ नये याची पूर्ण काळजी घेण्यात येईल, असंही स्वामींनी सांगितलं.
Leave a comment