बीड । वार्ताहर

 तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत करण्यास उत्सुक आहात. कारण २०२० हे वर्ष कोरोनात गेले.  आता उद्यापासून २०२१ हे वर्ष लागत आहे.

भारतात सर्वाधिक सण आहेत आणि त्यानुसार सुट्ट्याही असतात.  नव वर्षाचे कॅलेंडर हातात पडल्यावर काही लोक आपल्या सुट्ट्या किती मिळणार आहेत. याचे गणित करत असतात. त्यामुळे शनिवार रविवारला जोडून किती सुट्ट्या आहेत,   त्यानुसार आपले फिरण्याचे, गावी जाण्याचे प्लानिंग करत असतात. तर चला २०२१ मधील सुट्ट्यांवर एक नजर टाकूया...

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 2 ऑक्टोबर गांधी जयंती याशिवाय 2021 मध्ये इतर सुट्ट्या नेमक्या कधी असणार, लॉन्ग विकेंड  किती मिळणार? त्याचबरोबर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी मिळणारा बँक हॉलिडेज या सगळ्यावर एक नजर टाकूया.... 

२०२१ या वर्षाकडे लोक मोठ्या आशेने पाहात आहेत. मात्र, नव वर्षाच्या पूर्वसंध्येला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका असल्याने सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे नव वर्षातील पहिले काही महिने जरा टेन्शनचे जाणार आहेत. मात्र, नववर्ष चांगलेच असेल, अशी अपेक्षा धरणे चुकीची नाही. या नव्या वर्षात सुट्ट्याही चांगल्या आहेत. त्यामुळे एन्जॉय करता येणार आहे. पाहा नव्या वर्षात किती आहेत सुट्या!

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिना  

जानेवारीचा अर्धा महिना बँका बंद राहणार आहेत. कारण जानेवारीत तब्बल १४ दिवस 'बँक हॉलिडे' आहे. केवळ १७ दिवस बँका सुरू राहणार आहेत. ५ रविवार, २ शनिवारसोबत विविध सणांच्या सुट्ट्या आहेत. जानेवारी महिन्यात  २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाची एकच सुट्टी आहे. मात्र, २०२१ मध्ये २६ जानेवारी हा दिवस मंगळवारी येत आहे. म्हणून शनिवार-रविवार सुट्टी असणाऱ्यांना सोमवारची सुट्टी घेऊन चार दिवसांची सुट्टी घेऊन तुम्हाला फिरण्यास जाता येऊ शकते.

 

एप्रिल, मे आणि जून  

एप्रिल महिन्यात भरपूर सुट्ट्या आहेत. २ एप्रिलला गुड फ्रायडे, १३ गुढीपाडवा, १४ एप्रिलला आंबेडकर जयंती आणि २१ एप्रिलला राम नवमीची सुट्टी असणार आहे. २५ ला महावीर जयंती रविरवारी आली आहे.

 

- मे महिन्यात, १ मे शनिवार, १२ मे रोजी ईद-उल-फितरची सुट्टी आहे, तर २६ मे रोजी बुधवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी आहे. मात्र, जून महिन्यात एकाही सुट्टी नाही.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर  

- जुलै महिन्यात केवळ एकच सुट्टी आहे. बुधवारी, २१ जुलै रोजी ईद-उल जुहाची (बकरी ईद) सुट्टी असणार आहे. 

 

- १५ ऑगस्टला रविवार असणार आहे. १९ ऑगस्ट रोजी शुक्रवारी मोहरमची सुट्टी असणार आहे. यावेळी तुम्ही तीन दिवसांच्या सुट्टीची योजना आखू शकता. यावर्षी, जन्माष्टमी उत्सव सोमवारी, ३० ऑगस्टला आहे. 

- तर, सप्टेंबरमध्ये एकही सुट्टी नाही.

ऑक्टोबर महिना  

दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी आहे. गुरुवारी, ७ ऑक्टोबर रोजी अग्रसेन जयंती आहे. शुक्रवार, १५ ऑक्टोबर रोजी दसरा हा सण आहे. या आठवड्यातही आपण तीन दिवसांच्या सुट्टीची योजना आखू शकता. १९ ऑक्टोबर रोजी मंगळवारच्या दिवशी ईद-ए-मिलाद आहे, तर २० ऑक्टोबर रोजी महर्षि वाल्मिकी जयंती बुधवारी आली आहे.

नोव्हेंबर आणि डिसेंबर 

दिवाळी गुरुवारी, ४ नोव्हेंबरला असणार आहे. या आठवड्यातही आपण शुक्रवारची सुट्टी घेऊन चार दिवस सुट्टी घेवून छोट्या टूरची योजना आखू शकता. २५ डिसेंबर अर्थात ख्रिसमसच्या दिवशी शनिवार आहे.

काही सुट्या शनिवार आणि रविवार या (holidays on weekend) दिवशी असल्या तरी, काही सुट्ट्या आठवड्याच्या शेवटी आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही सलग तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेऊ शकाल. नवीन वर्षात सुमारे १० लाँग विकेंड येणार आहे. तर, ९ वेळा या सुट्ट्या नेमक्या आपल्या सुट्ट्यांच्या दिवशी येणार आहेत.

शनिवारी येणाऱ्या सुट्ट्या

नवीन वर्षामध्ये, २७ फेब्रुवारी (गुरुवारी, रविदास जयंती), २१ ऑगस्ट (ओणम), २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती), २५ डिसेंबर (ख्रिसमस) या सुट्ट्या शनिवारी आल्या आहेत. जर, तुम्हाला शनिवार सुट्टी असेल तर, या वेळेस या सुट्ट्यांचा वेगळा आनंद घेता येणार नाही 

रविवारी येणाऱ्या सुट्ट्या

२८ मार्च (होलिका दहन), ४ एप्रिल (ईस्टर दिन), २५ एप्रिल (महावीर जयंती), १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), २२ ऑगस्ट (रक्षाबंधन) हे सुट्ट्यांचे दिवस रविवारी येणार आहेत. 

स्थानिक सुट्ट्या

स्वातंत्र्य दिन, १५ ऑगस्ट, गांधी जयंती, बौद्ध पौर्णिमा, ख्रिसमस, दसरा, दिवाळी, गुड फ्रायडे, गुरु नानक जयंती, ईद-उल-फितर, बकरी ईद, महावीर जयंती, मोहर्रम आणि ईद-ए-मिलाद या सुट्ट्या केंद्र सरकारतर्फे दिल्या जातात. तर, होळी, जन्माष्टमी, महाशिवरात्री, मकर सक्रांती, रथयात्रा, ओणम, पोंगल, बसंत पंचमी इत्यादी सुट्टीचा निर्णय राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन घेेते.

 

 

56 दिवस बँका बंद, पाहा RBI ने जाहीर केले.....

 

वर्ष 2020 संपण्यासाठी 1 दिवस बाकी आहेत. 2021 या नवीन वर्षात एन्ट्री करण्यापूर्वी बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट जाहीर झाली आहे. RBI ने वर्षभरातील सुट्ट्यांची लिस्ट जाहीर केली आहे. या लिस्टनुसार, 2021 मध्ये एकूण 56 दिवस बँका बंद राहणार आहेत. यात शनिवार आणि रविवारची सुट्टीही आहे.

आरबीआय निर्देशांनुसार, बँका रविवारशिवाय महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. आरबीआयच्या वेबसाईटनुसार, सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार ठरवल्या गेल्या आहेत. काही सुट्ट्या संपूर्ण देशभरातील बँकांसाठी लागू आहेत. तर काही राज्यांसाठी त्या राज्यानुसार, विशेष सुट्ट्या आहेत.

जानेवारी 2021

 

जानेवारी 1, शुक्रवार - नवीन वर्ष

 जानेवारी 2, शनिवार - न्यू ईयर हॉलिडे

 जानेवारी 9, दुसरा शनिवार

 जानेवारी 11, सोमवार - मिशनरी डे

 जानेवारी 14, गुरुवार - मकर संक्रांती आणि पोंगल

 जानेवारी 15 ला तिरुवल्लुवर डे, काही राज्यांमध्ये सुट्टी

 जानेवारी 23, चौथा शनिवार

 जानेवारी 26, मंगळवार - प्रजासत्ताक दिन

फेब्रुवारी 2021

 फेब्रुवारी 13, दुसरा शनिवार

फेब्रुवारी 16, मंगळवार - वसंत पंचमी

 फेब्रुवारी 27, चौथा शनिवार - गुरु रविदास जयंती

मार्च 2021

 मार्च 11, गुरुवार - महाशिवरात्री

मार्च 13, दुसरा शनिवार

मार्च 27, चौथा शनिवार

 मार्च 29, सोमवार - होळी

एप्रिल 2021

 एप्रिल 2, शुक्रवार - गुड फ्रायडे

 एप्रिल 8, गुरुवार - बुद्धपोर्णिमा

 एप्रिल 10, दुसरा शनिवार

 एप्रिल 14, गुरुवार - बैसाखी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

 एप्रिल 21, बुधवार - राम नवमी

एप्रिल 24, चौथा शनिवार

 एप्रिल 25, रविवार - महावीर जयंती

मे 2021

 मे 1, शनिवार, कामगार दिन

मे 8, दुसरा शनिवार

मे 12, बुधवार - ईद-उल-फितर

 मे 22, दुसरा शनिवार

जून 2021

 जून 12, दुसरा शनिवार

 जून 26, चौथा शनिवार

जुलै 2021

 जुलै 10, दुसरा शनिवार

जुलै 20, मंगळवार - बकरी ईद

 जुलै 24, चौथा शनिवार

ऑगस्ट 2021

ऑगस्ट 10, मंगळवार- मोहरम

 ऑगस्ट 14, दुसरा शनिवार

 ऑगस्ट 15, रविवार - स्वातंत्र्यदिन

 ऑगस्ट 22, रविवार - रक्षाबंधन

 ऑगस्ट 28, चौथा शनिवार

 ऑगस्ट 30, सोमवार - जन्माष्टमी

सप्टेंबर 2021

सप्टेंबर 10, शुक्रवार - गणेश चतुर्थी

 सप्टेंबर 11, शनिवार - दुसरा शनिवार

 सप्टेंबर 25, शनिवार - चौथा शनिवार

ऑक्टोबर 2021

 ऑक्टोबर 2, शनिवार - गांधी जयंती

 ऑक्टोबर 9, दुसरा शनिवार

 ऑक्टोबर 13, बुधवार - महाअष्टमी

 ऑक्टोबर 14, गुरुवार - महानवमी

 ऑक्टोबर 15, शुक्रवार - दसरा

 ऑक्टोबर 18, सोमवार - ईद-ए-मिलान

 ऑक्टोबर 23, चौथा शनिवार

नोव्हेंबर 2021

नोव्हेंबर 4, गुरुवार - दिवाळी

नोव्हेंबर 6, शनिवार - भाऊबीज

 नोव्हेंबर 13 - दुसरा शनिवार

 नोव्हेंबर 15, सोमवार - दिपावली हॉलीडे

नोव्हेंबर 19, शुक्रवार - गुरुनानक जयंती

 नोव्हेंबर 27 - चौथा शनिवार

डिसेंबर 2021

डिसेंबर 11 - दुसरा शनिवार

डिसेंबर 25 - चौथा शनिवार आणि ख्रिसमस

 

बँका रविवारशिवाय महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. आरबीआयच्या वेबसाईटनुसार, सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार ठरवल्या गेल्या आहेत. काही सुट्ट्या संपूर्ण देशभरातील बँकांसाठी लागू आहेत. तर काही राज्यांसाठी त्या राज्यानुसार, विशेष सुट्ट्या आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.