मुंबई / प्रतिनिधी
कोरोनाचे संकट आवासून उभे आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने साजरे करा असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी रात्री ११ पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार खुले राहणार आहेत. मात्र रात्री ११ नंतर हे सर्व बंद होणार आहे. याचा अर्थ घराबाहेर जावून औषधे, जेवण, मित्राकडे जाणे यावर बंधन नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर बंधने आहेत. जनतेने राज्यसरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे असे आवाहन करतानाच मोठ्या शहरातील जी हिलस्टेशन आहेत तिथेही हेच निर्बंध पाळण्याच्या सूचना त्या- त्या जिल्हापोलिस अधिक्षकांना दिल्या असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
Leave a comment