लाचखोरीत महसूल आघाडीवर

बीड । वार्ताहर

भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे असे नेहमी भाषणातून ठणकावून सांगितले जाते. समाजातील भ्रष्ट प्रवृत्ती नाहीसी व्हावी यासाठी लोकजागृती केली जाते. परंतू पैशाचा मोह आवरत नसल्याने मोठ्या पदावरील अधिकारीही या लालसेपोटी सर्वसामान्यांची कामे करुन देतांना हजारोंची मागणी करुन पैसे स्विकारतात.अशा लोकसेवकांवर कायद्याचा जरब निर्माण करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग काम करतो. बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरत्या वर्षात लाच स्विकारणार्‍या 35 जणांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी वर्षभरात एकुण 21 गुन्हे दाखल झाले आहेत. यापूर्वी गतवर्षी जिल्ह्यात एसीबीकडून लाचखोरांविरुद्ध 23 गुन्हे दाखल झाले होते.


सन 2020 हे वर्ष कोरोना या महामारीने गाजले. मार्च ते जून या तीन महिन्याच्या काळात लॉकडाऊन झाले होते. परंतू त्याआधी व नंतरही जिल्ह्यात लाचेची प्रकरणे मात्र थांबायला तयार नव्हती. बीड एसीबीने वर्षभरात 35 आरोपींविरुद्ध 21 गुन्हे दाखल केले. यात महसुल तसेच अन्न औषध प्रशासनातील प्रत्येकी एका वर्ग 1 च्या अधिकार्‍यासह वर्ग 2 च्या 7 अधिकार्‍यानां लाच घेतांना रंगेहाथ पकडले. यात महसुल, जि.प., नगर विकास, पोलीस विभाग व जिल्हा बँकेतील प्रत्येकी एका अधिकार्‍याचा तर सहकार विभागातील 2 अधिकार्‍यांचा समावेश होता. या शिवाय जिल्ह्यातील वर्ग 3 मधील 15 अधिकारी लाच घेतांना रंगेहाथ पकडले गेले. यात महसुल विभागातील 4, जि.प. विभागातील 3, जिल्हा रेशीन कार्यालयातील 1 तसेच पोलीस विभागातील तब्बल 6 तर जिल्हा सहकारी बँक येथील एका अधिकार्‍याचा समावेश होता. वर्ग 4 चे महसुल, जिल्हा बँकेमधील दोन लोकसेवकही लाचेच्या सापळ्यात अडकले. 

 

या कारवाया दरम्यान 3 इतर लोकसेवकांवरही लाच प्रकरणी गुन्हे दाखल झाले. यात महसुल, जात पडताळणी कार्यालय व अर्बन को ऑपरेटिव्ह बँक येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. याशिवाय 6 खासगी इसमांनाही लाच घेतांना ताब्यात घेतले गेले.यामध्ये महसुलमधील 3, अन्न व औषध प्रशासन, नगरविकास विभाग व पोलीस विभागातील प्रत्येकी 3 जणांचा समावेश आहे. सर्वाधिक सहा लाचेचे गुन्हे महसुल विभागातील 11 जणांवर दाखल झाले. दरम्यान जिल्ह्यात वर्षभरात दाखल झालेल्या 21 गुन्ह्यातील 35 आरोपींनी लाच मागणी केलेली एकुण रक्कम 13 लाख 29 हजार 420 रुपये इतकी होती अशी माहिती एसीबीचे पोलीस उपाधिक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी दिली.या सर्व कारवाया एसीबीचे पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक  यांच्य मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पो.नि.रविंद्र परदेशी, पो.नि.राजकुमार पाडवी व कर्मचार्‍यांनी केल्या आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.