बीड | वार्ताहर
जिल्ह्यात आज शनिवारी (दि.26) 386 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यापैकी 364 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून केवळ 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.जि.प.चे मुख्य कार्यकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आले आहे.शिवाय नव्याने निष्पन्न होणार्या रुग्ण संख्येतही घट झाली आहे. आज शनिवारी 22 नवे रुग्ण निष्पन्न झाले.बाधितांमध्ये अंबाजोगाई 1, आष्टी 5, बीड 10, केज 1, माजलगाव 4 व परळी तालुक्यातील 1 रुग्णाचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 16 हजार 617 इतका झाला असून 15 हजार 789 जण कोरोनामुक्त झाले आहेत.526 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे.
Leave a comment