मध्यप्रदेशातही 'मुंडे साहेब अमर रहे, पंकजा मुंडे जिंदाबाद'च्या घोषणांनी परिसर दुमदुमला !
भोपाळ
भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा मध्यप्रदेशच्या सह प्रभारी पंकजाताई मुंडे यांचे आज भोपाळच्या राजा भोज विमानतळावर जोरदार स्वागत झाले. 'मुंडे साहेब अमर रहे', 'पंकजा मुंडे जिंदाबाद'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
सह प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पंकजाताई मुंडे आज पहिल्यांदाच मध्यप्रदेशच्या तीन दिवसाच्या दौ-यावर आल्या आहेत. सिहोर येथे भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला असून याठिकाणी त्या पुर्णवेळ उपस्थित असणार आहेत. आज सकाळी राजा भोज विमानतळावर त्यांचे आगमन होताच मोठया संख्येने जमलेल्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पुष्पहार व हातात फलक घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. महाराष्ट्रा प्रमाणेच येथेही मुंडे साहेब अमर रहे, पंकजा मुंडे जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुमीत पचौरी, शाम नायक, मोहन राठोड, वंदना जाचक यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. भटके विमुक्त मोर्चा व बंजारा समाजाच्या वतीने देखील त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भोपाळहून सिहोरला जाताना कार्यकर्त्यांनी वाहनाचा ताफा थांबवून त्यांचे स्वागत केले.
Leave a comment