माजलगाव । वार्ताहर
माहेश्वरी सभेचे जिल्हाउपाध्यक्ष अॅड. रमेश चंद्र जेथलिया वय 60 यांचे ह्रदविकारच्या तीव्र झटक्याने 25 डिसेंबर शुक्रवार सकाळी 8 वाजता निधन झाले.आज सायंकाळी 6 वाजता राजस्थानी वैंकुठं धाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाउपाध्यक्ष ,वकील संघाचे माजी अध्यक्ष राहिलेले अॅड. रमेशचंद्र जेथलिया हे डाव्या विचार सरणीचे,स्पष्टवक्ते विधींज्ञ म्हणून जिल्ह्यात परिचित होते.त्यांनी परळी येथील न्यायालयात अनेक वर्षे वकिली केली.आ उषा दराडे यांचे ते समर्थक होते.मागील 5 वर्षांपासून ते पहाटे 5 वाजता न चुकता शहरातील अनेकांना योगाचे धडे दिले.ग्रामीण भागात अनेक ठिकाणी त्यांनी योग शिबीर घेतले होते.आज सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु ह्रदविकारच्या जोराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात लहान बंधू सुरेशचंद्र, सुभाष चंद्र,पत्नी,मुलगा डॉ राहुल,डॉ नवल व एक मुलगी आहे.आज सायंकाळी 6 वाजता राजस्थानी वैकुंठ धाम येथे अग्निडग दिला जाईल.
Leave a comment