जिल्ह्यात आज कोरोनाचे 45 रुग्ण
बीड - प्रतिनिधी
जिल्ह्यात आज गुरुवारी (दि.17) 688 जणांची कोरोना चाचणी केली गेली. यामध्ये 45 नवे रुग्ण आढळून आले तर 643 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला.
नव्या रुग्णांमध्ये अंबाजोगाईत 8, आष्टीत 5, बीडमध्ये 18, गेवराईत 2, केजमध्ये 3, माजलगाव 4, परळी 1 व वडवणी तालुक्यातील 4 रुग्णांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 16 हजार 311 झाली असून बळींची संख्या 512 झाली आहे. आतापर्यंत 15 हजार 372 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
Leave a comment