मुंबई | प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या पोटाला चिमटा बसल्यावरच तो रागाने रस्त्यावर येतो व आंदोलनात सहभागी होतो. जर कृषीविधेयक शेतकर्‍यांच्या फायद्याचं आहे असं केंद्रसरकार बोलत असेल तर शेतकरी या कृषीविधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरला नसता असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना लगावला. 

जनता दरबारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी भवनमध्ये आले असता माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपले मत व्यक्त केले आहे. 

पवारसाहेब कालच राष्ट्रपतींना भेटले आहेत. त्यावेळी साहेबांनी या विधेयकावर काय केले पाहिजे हे सविस्तर मांडले आहे. केंद्रातील वरीष्ठ मंत्री शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत आहेत परंतु तोडगा अजून निघत नाहीय. केंद्रसरकार विधेयकात काही प्रमाणात बदल करणार असल्याचे सांगत आहे मात्र क्लीअर करत नाहीय असेही अजित पवार म्हणाले. 

देशातील शेतकरी हे विधेयक रद्द करा अशी भूमिका मांडत आहे. यामध्ये विरोधी पक्षांना राजकारण करायचं नाही. आज थंडीच्या दिवसात शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात राज्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत. तर मंत्रीमंडळातील राज्यमंत्री बच्चू कडू हे शेतकर्‍यांना घेऊन दाखल झाले आहेत. 

इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांची मागणी येते त्यावेळी केंद्राने हटवादीची भूमिका बाजूला ठेवून समंजस भूमिका घेतली पाहिजे. १०० टक्के सर्व गोष्टी आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा हे लोकशाहीत चालत नाही याची नोंद सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे असेही अजित पवार यांनी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.