,
सुप्रीम कोर्टाने याचिकेवरील सुनावणीस नकार
नवी दिल्ली | प्रतिनिधी
रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळू शकला नाही. सुप्रीम कोर्टाने रिपब्लिक टीव्हीविरोधातील सर्व एफआयआर रद्द करणे आणि तपास सीबीआयकडे वर्ग करण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. ही याचिका स्वभावत: महत्वाकांक्षी असल्याचे दिसत असल्याचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक करु नये आणि हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करावे अशी आपली मागणी आहे. मात्र ही याचिका मागे घेणेच योग्य असेल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. याचिकाकर्त्याने ही याचिका मागे घेतली आहे.
रिपब्लिक टीव्ही विरोधात सर्व एफआयआर रद्द करण्यात यावेत आणि हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे देण्यात यावे असे याचिकेत म्हटले होते. याशिवाय संपादकीय विभागातील कोणीही, तसेच इतर कोणत्या कर्मचाऱ्याला अटक होता कामा नये, असे याचिकेत म्हटले होते.
Leave a comment