कोळवाडी फाटा येथील घटना
बीड । वार्ताहर
भरधाव टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. आज मंगळवारी (दि.१) सकाळी ११ वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर महामार्गावर कोळवाडी फाटा येथे ही घटना घडली.
शंकर तात्याबा जाधव (७० रा.कोळवाडी ता.बीड) मयताचे नाव आहे. ते आज सकाळी रस्त्याच्याकडेने जात असताना बीड तालुक्यातील कोळवाडी फाटा येथील बसथांब्यासमोर त्यांना सोलापूहून जळगावकडे जाणार्या टेम्पोने (एमएच-१९ झेड-५४९७) जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी बीड ग्रामीण ठाण्याचे सोनवणे, एकाळ यांनी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.पोलीसांनी टेम्पोसह चालकास ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
वाहनाच्या धडकेनंतर अॅटोरिक्षा उलटला; चौघे जखमी
परळी-सिरसाळा रस्त्यावर मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ब्रम्हवाडी शिवारात झाला. ब्रम्हवाडी येथून अॅटो रिक्षा (एम.एच.२३ टी.आर.३११) हा काही प्रवाशांना घेऊन परळीकडे निघाला होता. टोकवाडीजवळ या रिक्षाला अज्ञात वाहनांने जोराची धडक दिली. रिक्षा पलटी झाल्याने प्रवाशी शिवमुर्ती रोडे, वनुबाई माने, आशाबाई फड, सागरबाई फड जखमी झाले असून यातील शिवमुर्ती रोडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलविण्यात आले तर इतर जखमींवर परळी येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Leave a comment