मुंबई -
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपा नेत्या पंकजा मुंडे या सक्रिय होत्या. यानंतर पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांनी स्वत: विलगीकरणात गेल्या आहेत.
मुंडे यांनी रात्री उशिरा याबाबत ट्वीट करत माहिती दिली.पंकजा मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे.
अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,असे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांनी ट्वीट करत रात्री उशिरा यासंदर्भातील माहिती दिली आहे
माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे पंकजा यांनी आयोसेलट होण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, पंकजा यांनी पदवीधर निवडणुकीच्या मतदानासाठी औरंगाबादच्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहनही केले आहे.
पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगितले आहे. 'सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे' असं पंकजा यांनी सांगितले आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता पंकजा मुंडे यांनी खबरदारी म्हणून आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला आहे.
तसंच आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पंकजा मुंडे यांची औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी प्रतिष्ठापणाला लागली आहे. त्यामुळे पंकजा यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मत देऊन विजयी करावे' असं आवाहन केले आहे.
तसंच, 'अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी' असं सूचक विधानही पंकजा यांनी केले आहे.
औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी पाहण्यास मिळाली आहे. भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी जाहीरपणे बंडखोरी करत नवी चूल मांडली आहे. एवढंच नाहीतर बीडमधील माजी खासदार आणि मंत्री जयसिंग गायकवाड यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा प्रचारही जयसिंग गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
Leave a comment