बीडमधील LIC ऑफिसला भीषण आग; कागदपत्रं, साहित्य जळून खाक

 

रेकॉर्ड कॉम्पुटराईज्ड असल्याने सुरक्षित 

 

बीड | वार्ताहर

 बीड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एलआयसी ऑफिसला आज पहाटे आग लागली. या आगीत ऑफिसमधील सगळे साहित्य जाळून खाक झाले. यात कार्यालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या साहित्याबरोबरच मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे कागदपत्रेही होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली असून मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ उठले होते. पहाटेची वेळ असल्याने आग पूर्ण ऑफिसमध्ये पसरली. आग एवढी भीषण होती की ऑफिसमधील साहित्याच्या अक्षरशः कोळसा झाल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.

पहाटे वेळ असल्यामुळे एलआयसी ऑफिस आग सर्वत्र लवकर पसरली. त्यामुळे ऑफिसचं मोठ्या प्रमाणात  नुकसान झाल्याचं समोर येत आहे. ऑफिसमधील जुने दस्तावेज, कॉम्प्युटर आणि महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले असले तरी .एलआयसीचे सर्व रेकॉर्ड कॉम्पुटराईज्ड असल्याने सुरक्षित आहे. त्याचबरोबर रोख रक्कम असलेली तिजोरीही सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एलआयसीचे सर्व रेकॉर्ड कॉम्पुटराईज्ड असल्याने सुरक्षित आहे. त्याचबरोबर रोख रक्कम असलेली तिजोरीही सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र ऑफिसचे प्रचंड नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. ही भीषण आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल्या झाल्या होत्या. अग्निशमन दलातील जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. ही भीषण आग अग्निशमन दलाने पूर्णपणे आग आटोक्यात आणली आहे. त्यामुळे सध्या ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. पहाटेच्या सुमारास भीषण अग्नितांडव एलआयसी ऑफिसमध्ये झाला असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.