मुंबई । वार्ताहर

 

मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात येत असताना महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय जाहीर करताना आणखी काही बाबतीत दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. 

लॉकडाऊनबाबत राज्य सरकारने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार बहुप्रतीक्षित हॉटेल,रेस्टॉरंट आणि बारबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ५ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट आणि बार खुले होणार आहेत. ५० टक्के क्षमतेने ते चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत पर्यावरण विभागाकडून स्वतंत्र गाइडलाइन्स जारी करण्यात येणार आहेत. त्यात कोणती खबरदारी घ्यायची आहे, याबाबत निर्देश देण्यात येणार आहेत. 

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


 

राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरु करण्यास परवानगी; शाळा, धार्मिक स्थळे मात्र बंद राहणार

 

 राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सुरू होणार आहेत. पण ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक-5 चे नियम आज जाहीर केले आहेत. 

रेस्टॉरंट आणि बार सुरू करताना कोणती काळजी घ्यायची, इतर काय अटी असतील हे पर्यटन विभाग लवकरच जाहीर करणार आहे. लॉकडाऊनमध्ये मार्च महिन्यापासून रेस्टॉरंट आणि बार बंद आहेत.

दुसरीकडे शाळा, महाविद्यालये हे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. सिनेमागृह, स्वीमिंग पूल देखील बंदच राहणार आहे. मेट्रोही बंद राहणार राहणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळं खुली करण्याची मागणी होत आहे. मात्र अनलॉक 5 मध्ये देखील धार्मिक स्थळे ही बंद राहणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.


 

या बाबी सुरु होणार

 

- हॉटेल, फुड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार ५ ऑक्टोबर पासून सुरु होणार

- हॉटेल आणि बारला परवानगी देण्यात आली असली तरी ५० टक्क्याहून अधिक ग्राहकांना परवानगी नसेल.

- हॉटेल आणि बारसाठी पर्यटन खात्याकडून वेगळी नियमावली जाहीर केली जाईल.

- मुंबई आणि MMR रिजन मधील सर्व अत्यावश्यक नसलेल्या औद्योगिक संस्थाना सुरु करण्याची परवागनी देण्यात आली आहे.

- ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना पुर्ण वेळ परवानगी असेल.

- राज्यातंर्गत रेल्वे सेवेला परवानगी देण्यात आली आहे.

- मुंबई मधील रेल्वे सेवेतील ट्रेनची संख्या वाढविण्यात आली आहे.

- डब्बेवाल्यांना मुंबई उपनगरीय रेल्वेत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तालयातून त्यांना क्यूआर कोड उपलब्ध करुन दिले जातील.

- पुणे जिल्ह्यातील लोकल ट्रेन सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

यावर बंदी कायम

- राज्यात ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था बंदच राहणार असून ऑनलाईन आणि दुरस्थ शिक्षणाला परवानगी देण्यात आलेली आहे.

- सिनेमागृह, स्विमिंग पुल, नाटकाचे थेटर, मनोरंजन पार्क, सभागृह बंदच राहणार

- आंतरराष्ट्रीय प्रवासास बंदी राहणार

- मेट्रो रेल्वे

- सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदीच राहणार

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.