थोबाड फोडो आंदोलन करणार
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदचा निर्णय
कोल्हापूरच्या गोलमेज परिषदेत घोषणा
कोल्हापूर । वृत्तसेवा
सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा समाजातर्फे राज्यभर आंदोलनं केली जात आहेत तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात आज राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषद झाली. गोलमेज परिषदेत मोठी घोषणा करण्यात आली आहे. येत्या 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी यापुढे ’थोबाड फोडो आंदोलन’ करण्यात येणार आहे. मात्र, सुरूवात कोणत्या नेत्यापासून करणार, हे सांगणार नाही, असा इशारा मराठा गोलमेज परिषदेत मराठा समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक यांनी दिला आहे.
विजयसिंह महाडिक यांनी सांगितलं की, मराठा समाज आता गनिमी काव्यानं आंदोलन करणार आहे. गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव सर्व सहमतीनं मांडण्यात आले. त्यावर चर्चा सुरू आहे. गोलमेज परिषदेला राज्यभरातील मराठा समाजाचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ’थोबाड फोडो आंदोलन’ करण्यात येणार आहे. मात्र, सुरूवात कोणत्या नेत्यापासून करणार, हे सांगणार नाही. आरक्षणाला स्थगिती मिळताच पोलीस भरतीची घोषणा करणार्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशीही केली मागणी करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा बांधव नाराज झाले आहेत. मराठा समाजार्फे राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. दुसरीकडे, आज (बुधवारी) कोल्हापूर शहरात राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव सर्व सहमतीनं मांडण्यात आले. त्यावर चर्चा सुरू आहे. गोलमेज परिषदेला राज्यभरातील मराठा समाजाचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
Leave a comment