अबू धाबी --
आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात अबू धाबी येथे सामना होणार आहे. दरम्यान मुंबईनं पहिलाच सामना प्रथेप्रमाणे गमावला, तर कोलकाता तेराव्या हंगामातील पहिला सामना आज खेळणार आहे. यंदा KKR कडून आयपीएलमध्ये पहिला अमेरिकी क्रिकेटर पदार्पण करणार आहे. 29 वर्षीय अली खानलाआज मुंबई विरुद्ध खेळण्याची संधी मिळू शकते.
अली खानला इंग्लंडचा गोलंदाज हॅरी गुरनेच्या जागी संघात घेण्यात आले आहेत. अली खान आयपीएल खेळणारा पहिला अमेरिकन क्रिकेटर आहे. अलीचा जन्म पाकिस्तानमधील पंजाबमध्ये झाला होता. मात्र अली 18 वर्षांचा असताना तो कुटुंबियांसमवेत ओहियोला आला. तेव्हा पासून अली अमेरिकेकडून तसेच कॅरिबयन प्रीमिअर लीग पीएसएल, ग्लोबल टी-20 आणि बीपीएल सारख्या टी-20 स्पर्धा खेळत आहे.
CPLमध्ये आला होता चर्चेत
नुकत्याच झालेल्या कॅरिबयन प्रीमिअर लीगमध्ये खान त्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळला होता. त्यानं महत्त्वाची भुमिका बजावली होती. त्रिनबागो नाइट रायडर्सचा मालकही शाहरूख खान आहे. अलीनं जेव्हा टी-20 स्पर्धा खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या जलद गोलंदाजीनं त्यानं सर्वांना प्रभावित केले. एवढेच नाही तर अलीची गोलंदाजी पाहून वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज कर्टनी वॉल्शही त्याचे चाहते झाले होते.
2016मध्ये झाला अमेरिकन नागरिक
अलीला 2016मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले होते. गेल्या वर्षी अलीनं अमेरिकेडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. अलीने 9 लिस्ट ए सामने खेळले आहेत. यात 23 विकेट घेतल्या आहेत. तर, 36 टी-20 सामन्यात 38 विकेट घेतल्या आहेत. खानची खासियत आहे त्याची गती. तो 140 किमी वेगानं गोलंदाजी करू शकतो, त्यामुळे त्याचा सामना करणं मुंबईसाठी कठिण जाऊ शकते. अली डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतो. अलीच्या यॉर्करपासून वाचणं मुंबईच्या फलंदाजांसाठी कठिण जाऊ शकते.
Leave a comment