मुंबई

विधान परिषदेच्या उपसभापती निवडणूक अखेर पार पडली आहे. भाजपने ऐनवेळी हायकोर्टात धाव घेऊन निवडणूक रद्द करण्याची खेळी केली. पण, शिवसेनेनं या निवडणुकीत बाजी मारली आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे.

सभापती रामराजे निंबाळकर यांनी नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून घोषणा केली आहे.  संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी  प्रस्ताव मांडला आणि त्याला शेकाप जयंत पाटील  यांनी मंजुरी दिली. त्यानंतर सभापतींनी नीलम गोऱ्हे यांच्या नावाची घोषणा केली.

त्याआधी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी 'आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे निवड करू नये', अशी मागणी केली होती. परंतु, सभापतींनी, 'कोर्टात भाजप गेली आहे, कोर्टाने मला अद्याप काही कळवले नाही. त्यामुळे तुम्ही काय मागणी केली आहे, हे मान्य करणार नाही. विधिमंडळाला कोर्टाला आदेश देण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे सभापती म्हणून निर्णय मी घेईल', अशा शब्दात सभापती निंबाळकर यांनी दरेकर यांना फटकारून काढले होते.

'नीलम गोऱ्हे कायम संकटात मदतीस धावून जाणाऱ्या आहेत. महिला अत्याचार यावर कायम आवाज उठवतात. सभागृह सदस्य म्हणून नीलम गोऱ्हे यांचे काम उत्तम केले आहे. आधीही उपसभापती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. यापुढे चांगले काम करत राहावे', अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

दोन दिवसात नाट्यमय घडामोडी

सोमवारी विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर दुसरीकडे भाजपनेही आपला उमेदवार उतरवला होता. पण, आता भाजपने ही निवडणूक होऊच नये, यासाठी कोर्टात धाव घेतली. मुळात भाजपचे काही आमदार हे विधान परिषदेत गैरहजर आहे. 3 आमदार कोरोनामुळे आजारी आहेत. तर 4 आमदार हे पुरामुळे येऊ शकले नाहीत. त्यांना मतदानाचा अधिकार द्यावा, अशी मागणी भाजपने केली. ही निवडणूक नैसर्गिक वातावरणात व्हावी अशी मागणी भाजपने केली होती. विधान परिषद उपसभापती निवडणूक मु्ददावरून विरोधकांनी सभात्याग केला.

विशेष म्हणजे, भाजपकडे संख्याबळ नसतानाही निवडणूक रद्द करण्याची खेळी केली. परंतु, शिवसेनेनं भाजपचा हा डाव हाणून पाडला. उपसभापतीपदावर याआधी नीलम गोऱ्हे यांचीच निवड झाली होती. आता पुन्हा एकदा याच पदावर गोऱ्हे यांची निवड झाली आहे.

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.