खडका गावात दोन व्यक्ती बाधित
आरोग्यमंत्र्याच्या मतदार संघात कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार
तीर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील बोडखा येथेल कोरोना पॉझिटिव्ह रूग्नांचे शव डॉक्टरांनी दिले नातेवाईकांना आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार याविषयी अधिक माहिती अशी की घनसावंगी तालुक्यातील बोडखा येथील 70 वर्षीय कुंडलिक ढेरे यांना तब्येत बिघडल्यामुळे कोरोना हॉस्पिटल जालना येथे ता. 31 जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. तपासणी दरम्यान ता.2 ऑगस्ट रोजी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझीटीव्ह आला व त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यातच त्यांतच ता. 13 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू देह जालना डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला यानंतर हिंदू रितीरिवाजाप्रमाणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
घनसावंगी तालुक्याचे तहसीलदार नरेंद्र देशमुख तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नागेश सावरगावकर व वैद्यकीय अधिकारी सुयोग जुजगर यांना या सर्व बाबतीत माहिती असतानादेखील कोरोना पॉझीटीव्ह व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांकडे कसा सुपूर्द केला असा प्रश्न आता उपस्थित झालाअसून. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्याच्या नात्यातीलच 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती निघाले आहेत. या सर्व घडलेल्या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणा सपशेल ङ्गेल झाली.आसल्याची तक्रार शिवसेनेचे घनसावंगी तालुका अध्यक्ष उद्धव मरकड यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी जालना व मुख्यमंत्री कार्यालय मुंबई येथे केली आहे व घडलेल्या प्रकाराची चौकशी करून तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. नसता शिवसेनेच्या स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अरोग्यमंत्री मंत्र्याच्या मतदार संघामध्ये हा प्रकार घडला असून यामध्ये आरोग्य यंत्रनेचा किती भोंगळ कारभार आहे यावरून दिसून येत आहे. घनसावंगी तालुक्यामध्ये सध्या बोडखा घनसावंगी तीर्थपुरी दैठणा भोगगाव खडका हिवरा गावामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून तहसीलदार व संबंधित डॉक्टर यंत्रणा यांचे लक्ष नसल्याचे या प्रकारांमधून दिसून येत आहे व घनसावंगी तालुका येथे विलगीकरण कक्षातील लोकांची देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत असून आरोग्य यंत्रणेच्या संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे
Leave a comment