माजलगाव: उमेश जेथलिया
2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या माजलगाव नप च्या निवडणुकीत 76% मतदान होऊन 31241 मतदारांनी नेमका कोणाच्या बाजूला कौल दिला आहे यांची उत्सुकता शिगेला पोहचली असून माजलगावचा नगराध्यक्ष कोण यावर लाखोच्या पैजा लागल्या आहेत. राष्ट्रवादी अप चे सौ मेरुनिसा खलील पटेल, राष्ट्रवादी श प चे सौ शिफा बिलाल चाऊस व भाजपच्या कु संध्या ज्ञानेश्वर मेंडके अशा अटी तटीची झालेल्या लढतीत भाजप-राष्ट्रवादी (अप) च्या स्वतंत्र लढतीचा फायदा सरळ राष्ट्रवादी (शप) ला होताना दिसत असून राजकीय विश्लेष्काच्या अंदाजानुसारही फक्त शिफा चाऊस जादूई फिगर गाठतील असाच कयास आहे.
माजलगाव नप नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला आ सोळंके यांनी अतिशय प्रतिष्टेची केली असून त्यांनी प्रचारदरम्यान माजी नगरध्यक्ष सहाल चाऊस व बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांच्याविरोधात कधी नव्हे तो आक्रमक व एकेरी प्रचार केला होता. सहाल चाऊस व पोटभरे यांनी ही चोख प्रत्युत्तर देत शहराची बकाल अवस्था व टक्केवारी च्या प्रश्नावर आ सोळंकेना घेरले होते.
आ. सोळंकेचा डाव फसणार का?
जातीच्या गणितात विजयाचे उत्तरं शोधण्यासाठी आ सोळंके यांनी 41 हजारात 15000 मुस्लिम मतदार गृहीत धरून मुस्लिम ओबीसी उमेदवार देण्याचा डाव आ सोळंकेनी खेळून मेहरुणीसा पटेल यांना उमेदवारी दिली खरी पण मुस्लिम मतदान म्हणावे तेवढे खेचण्यात पटेल यांना यश आल्याचे सकृत दर्शनी दिसत नाही . शिवाय मागील वर्षभरात आ सोळंकेनी ओबीसी नेतृत्वा विरोधात केलेले वक्त्यव्य, ओबीसी समाजाच्या आरक्षणं विषयीची भूमिका पटेल यांना हिंदू ओबीसी मतदाना पासून दूर ठेवणारी आहे. त्यामुळे विजयाचीं जादूई फिगर गाठण्यात ते कितपत यशस्वी होतील यात शन्का आहे.
भाजपचे"डबलगेमर " विजयातील अड्सर
भाजपा कडून ओबीसी चेहरा म्हणून जुने निष्ठावंत ज्ञानेश्वर मेंढके यांच्या मुलीला उमेदवारी देऊन चांगली लढत दिली. भाजपचा बालेकिल्ला म्हणून शहराकडे पाहिले जात असले तरी "डबल गेम" करण्यात माजलगाव भाजपा पधाधिकाऱ्याचे हात महाराष्ट्रत कोणी धरू शकत नाही. पदाधीकरी परळीत दरबारात वेगळे बोलतात व माजलगाव मध्ये वेगळे वागतात असा अनुभव काही उमेदवाराना आल्याची चर्चा आहे. शिवाय तिकीट वाटपात ही "अर्थपूर्ण" व्यवहाराची चर्चा निवडणुकीत होती.भाजपा पदाधिकारी यांचे अंधारात विरोधकांशी उजेडात पक्षाशी असे वरून कीर्तन आतून तमाशा धोरण भाजप उमेदवारला विजयी करणार का हे उद्या कळेलच..!
चाऊस यांची पुण्याई सुनेला तारणार का?
राष्ट्रवादी शप गटाचे शिफा बिलाल चाऊस यांना सासऱ्याची पुण्याई तारण्याची शक्यता असून चाऊस घराण्याचे राजकारणा व्यतिरिक्त सबंध,नेहमी जनतेत रहाणे,प्रत्येकाच्या मदतीस धावून जाणे,मुस्लिम मतदाराचा पटेल पेक्षा चाऊस यांना पसंती, व्यापारी मतदारात चाऊस घराण्यास असलेली पसंती शिफा बिलाल चाऊस यांना विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन जाताना दिसत आहे.त्यांच्या वरील भ्रष्टाचारचे आरोप किंवा त्यांची जेलवारी त्यांच्या विजयाला रोखणार का हे पण उद्या कळेलच..!
प्रभागनिहाय राष्ट्रवादीचेच पारडे जडं
प्रभाग निहाय 26 जगासाठी झालेल्या मतदानात ही राष्ट्रवादी शप व राष्ट्रवादी अप दोघातच तुल्यबळ लढत असून राष्ट्रवादी शप अंदाजे 11 ते 14 जागी, राष्ट्रवादी अप अंदाजे 8 ते 11 जागी भाजप 1 ते 4जागी तर एक किंवा दोन अपक्ष, एक एम आय एम ही प्रभागात बाजी मारण्याचा अंदाज "लोकप्रश्न" च्या चाचपणीत आढळून आले आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment