श्री नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बीड जिल्हा वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य तथा स्वातंत्र्य सेनानी सामाजिक क्षेत्रातील एक अलौकिक नाव ॲड जगन्नाथराव रंगनाथराव औटे यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दिनांक 4 मे रोजी दुपारी 12 वाजता दुःखद निधन झाले.
ॲड.जगन्नाथराव औटे. यांचे आज दुपारी बारा वाजता दुःख निधन झाले त्यांचा अंत्यविधी भगवान बाबा प्रतिष्ठान जवळील स्मशानभूमी बार्शी रोड बीड या ठिकाणी आज दिनांक चार मे रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास होईल.
पाचंग्री या छोट्याशा गावी त्यांचा जन्म झाला होता प्राथमिक शिक्षण जातेगाव येथे झाले तर विधी शिक्षण हे हे पुणे येथे झाले होते. बलभीमराव कदम यांनी स्थापन केलेल्या 'मराठा बोर्डिंग' ते विद्यार्थी होते. त्यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून सुद्धा स्वातंत्र्यपूर्वकाळात भारत देश स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठे योगदान व काम केले आहे. सत्यशोधक समाजाचा त्यांच्यावर पगडा होता. बीड जिल्हा न्यायालयात एक जेष्ठ विधीज्ञ म्हणून जवळपास 60 वर्षापेक्षा जास्त वकिली केली आहे त्यांच्या सेवेबद्दल महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलने त्यांचा सीनियर अडवोकेट्स म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव केला होता. बीड जिल्हा न्यायालय वकील संघ यांच्या जडणघडणीत त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे ते एक चालते बोलते विद्यापीठ होते त्यांनी असंख्य वकिलांना मार्गदर्शन केले आहे व त्यांचे काही ज्युनिअर आज न्यायिक पदावर काम करत आहेत.
नुसते वकील व्यवसायावर नाही तर त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून व सर्वांना शिक्षण महत्त्वाचे बाब आहे यासाठी शिक्षण संस्थेमध्ये स्थापनेपासून काम केलेले आहे बीड शहरातील नावाजलेल्या श्री नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत तसेच विवेकानंद शिक्षण संस्थेचेही ते संचालक आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनात एक कडवा शेतकरी कामगार कष्टकरी गरीब पीडित अन्यायग्रस्त यांच्याकरिता ते नेहमी धवन जात असत अनेक राजकीय सामाजिक संस्थांचे त्यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे ते एक कुटुंबात्सल व सर्व ज्युनिअर वकिलांचे आवडते काका या नावाने ते सर्वपरिचित होते ते वकील संघाचे माजी अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत अशा या थोर स्वातंत्र्यसेनानी यांची आज प्राणज्योत मावळली मृत आत्म्यास शांती लाभो ईश्वरचरणी प्रार्थना.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले वकील संघाचे माजी अध्यक्ष एडवोकेट हेमंत उर्फ बप्पा औटे जयंत दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे.

Leave a comment