हे तर आमदार सुरेश धस आणि त्यांच्या कुटूंबाची बदनामी करण्याचे कट कारस्थान
मागे घ्या... खोटे गुन्हे मागे.. आ.धस यांच्या कुटुंबावरील खोटे गुन्हे मागे घ्या...रॅली काढत एकच घोषणाबाजीने आदिवासी समाज आक्रमक..
आष्टी (प्रतिनिधी)
आ. सुरेश रामचंद्र धस आणि त्यांचे कुटुंबीयांच्या बदनामीचे कटकारस्थान करून राजकीय षडयंत्र थांबावावे तसेच या प्रकरणाची आपण सखोल चौकशी करून आ.सुरेश धस यांची व कुटुंबाची बदनामी थांबावी व संबधीतावर गुन्हे दाखल करावेत. या कथित प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शोधून त्याच्यावर कार्यवाही करावी अन्यथा आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करू असा इशारा
आष्टी तालुक्यातील आदिवासी पारधी समाज बांधवांनी निवेदनाद्वारे विभागीय पोलीस अधिकारी यांच्या कडे केली आहे.यावेळी
आष्टी तालुक्यातील आदिवासी पारधी समाजाचे पुरुष,महिला यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. आ.धस यांच्या कुटुंबावरील खोटे गुन्हे मागे घ्या.अशा घोषणा देत विभागीय पोलीस कार्यालय ते आष्टी पोलीस स्टेशन अशी पायी रॅली करण्यात आली.तसेच तहसीलदार यांना ही या समाज बांधवांनी निवेदन दिले.
या निवेदनात असे म्हंटले आहे की,
आ. सुरेश धस हे गेल्या ३० वर्षापासून सरपंच पदापासून आमदार आणि नंतर मंत्री पदापर्यंत पोहोचलेले राजकीय व्यक्तिमत्व असून त्यांनी सुरुवातीच्या काळापासून आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये गोरगरीब, तळागाळातील माणसांसाठी मोठे काम केले आहे.आम्ही पारधी या जमातीचे लोक आहोत सुरेश धस यांनी अगदी सुरुवातीपासूनच आमच्या समाजातील विद्यार्थी आणि महिला यांच्यासाठी अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केलेले असून अनुसूचित जमातीचे सर्व लाभ मिळवून दिले आहेत तसेच आमची पारधी ही जमात गुन्हेगारी म्हणून ओळखली जात असताना आमच्यावर गुन्हेगार म्हणून ओळख पुसली जावी यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत आमच्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी मदत करून नोकऱ्या लावलेल्या आहेत. अनेक मुला-मुलींना शासकीय सेवेत नोकरीला त्यांनी मदत केलेली आहे तसेच आ.सुरेश धस हे दरवर्षी न चुकता गुढीपाडवा, भाऊबीज आणि रक्षाबंधन हे सण आमच्या गोरगरीब पारधी समाजाच्या सोबत साजरा करतात. अशा आ.सुरेश धस सारख्या उंची असलेल्या व्यक्तिमत्वाला आमच्या समाजातील ठराविक व्यक्तींना हाताशी धरून राजकीय सूडबुद्धीने काही राजकीय लोक त्यांच्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत याचा आम्हाला खेद वाटतो.
" त्यामुळे नुकत्याच झालेल्या वाळूंज येथील कथित घटने मुळे आमचा संपूर्ण समाज बदनाम होत असून त्यामुळे आमच्याकडे दूषित वाईट नजरेने पाहिले जात आहे "
आ.सुरेश धस व त्यांच्या कुटुंबाला जाणीव पूर्वक बदनाम करण्याचे कट कारस्थान रचले असून आमच्या भागातील सर्व पारधी समाजासाठी अहोरात्र झटणारे नेते म्हटले की आ .सुरेश धस यांचे नाव पुढे येते, या कुटुंबाचा इतिहास पाहिला तर स्व. रामचंद्र दादा धस हे पारधी समाजाचा आधार होते कोणाची काही अडचण आली तर दादा आमची अडचण सोडवत असायचे .तर यांचा वारसा आज आ .सुरेश धस (अण्णा)हे पुढे चालवत आहेत . आज आ. सुरेश धस यांच्यावर जाणीवपूर्वक बदनामी चा डाव रचला जात आहे आ.सुरेश धस हे आमच्या पारधी समाजाच्या व इतर भटक्या विमुक्त व वंचित समाजाच्या कधीच विरोधात नाहीत. त्यांच्यावर कुटुंबियावर चुकीचा गुन्हा दाखल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. यात राजकीय काही अदृश शक्ती असून धस कुटुंबाला बदनाम करण्याचा व आमच्या समाजातील काही लोकांना हाताशी धरून चुकीचे कृत्य करणे व समाज विरोधात घालवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असून आम्हाला हे प्रकरण कळताच आम्ही सर्व समाज तात्काळ आमच्या सदैव हाकेला धावणाऱ्या नेत्याच्या पाठीशी उभे राहण्यासाठी एकत्र आलो आहोत.हे सर्व प्रकरण खोटे असून जाणीवपूर्वक धस कुटुंबाला बदनाम करण्याचा कुटील डाव असून . या प्रकरणाची मा.डी.वाय.एस.पी साहेब आपण सखोल चौकशी करून आ.सुरेश धस यांची बदनामी थांबावी व संबधीतावर गुन्हे दाखल करावेत. व या कथित प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शोधून त्याच्या कार्यवाही करावी अन्यथा आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करू.
त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले सुरेश धस हे आमचे मान्यवर नेते असून त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या बदनामीचे कटकारस्थान तात्काळ उघडकीस यावे यासाठी आपण कारवाई करावी.
यत्रेश पप्या काळे,तेजा गोरख काळे,हैवान फांशा काळे,मच्छिंद्र अंशा काळे,पप्या फानशा काळे,गोरख फांश काळे,शंकू हैवान काळे,गंडे हैवान काळे,निकिता हैवान काळे,विवेक हैवान काळे,माया इंत्रेश काळे,श्रीधर हैवान काळे,कोयना हैवान काळे,लिलाबाई गोरख काळे,पांत्री बाई नागरगोत्याकाळे,नागोरगोजे गोरख काळे,स्वाती तेजा काळे,सुप्रिया दीपक काळे,नक्कल बाई पप्या काळे,पिनी शंकू काळे
सस्त्या हैवान काळे,सुनिता सस्त्या काळे,अक्षय मच्छिंद्र काळे,श्रीलांक मच्छिंद्र काळे,दीपक गोरख काळे,बाळू कचरू भोसले,गठ्ठ्या विठ्ठल भोसले,मिराबाई कट्टा भोसले,विकी किरण काळे,बायदान विक्की काळे,अजय दीपक काळे,हिना अजय काळे,शिवाजी भोसले
स्वाती तनपुरे भोसले,शिवाजी जाणक्या भोसले,लखाबाई शिवाजी भोसले,
जनक्या शिवाजी भोसले,परी ग बाई संख्या भोसले,उज्वला संख्या भोसले,बाळू भोसले
सतीश भोसले,अस्मिना सचिन भोसले,दिव्या भंग्या भोसले,दीदी अभिषेक भोसले,संगीता दादा भोसले,पंढरीनाथ बंदर काळे,गोरख भोसले,रेश्मा पंढरीनाथ भोसले,अंकुश निपलाशा भोसले,निरंकारी टिळक काळे
श्रीकांत तेजा काळे,रोहीनगंड्या काळे,विशाल पप्या काळे,उत्तम भोसले,जिजाबा उत्तम भोसले,सानप काळे,कारभारी काळे,बाबासाहेब काळे,तनपुरे भोसले,शिल्पा काळे,जिदन काळे,स्वाती भोसले,ऐश्वर्या काळे,शिवाजी भोसले,जक्या भोसले,परगी भोसले, ठीळक काळे आदींच्या आष्टी तालुक्यातील पारधी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Leave a comment