दोन वर्षांनंतर होणार दहावी बारावीच्या परीक्षा
पुणे | वार्ताहर
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी अनेक परीक्षांना मुकले होते. ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट आल्यानंतर यंदातरी परीक्षा होणार का? असा सवाल अनेक विद्यार्थ्यांना पडला होता.
महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा. कारण 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 10 वी 12 परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 12 वीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल रोजी होणार आहे. तर 10 वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल रोजी होणार आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो आता कंबर कसून अभ्यासाला लागणं महत्त्वाचं आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या तारखा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यात.
वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. तर दहावीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे. २५ फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
या परीक्षा कशा होणार केंद्र कोणती असणार? कोरोनाचे सर्व नियम पाळून परीक्षा कशा होणार याबाबत सविस्तर माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या हातात अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या दरम्यान होणार तोंडी परीक्षा
दरम्यान इयत्ता दहावी आणि बारावीच्या तोंडी परीक्षा कधी होणार आहेत याबद्दलही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. इयत्ता बारावीच्या तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2022 दरम्यान होणार आहे. तर इयत्ता दहावीच्या तोंडी परीक्षा 25 फेब्रुवारी 2022 ते 14 मार्च 2022 दरम्यान घेण्यात येणार आहेत.
ऑफलाईनच होणार परीक्षा
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनच्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यार्थ्यांचे वर्ग हे ऑनलाईन पद्धतीनं सुरु होते. परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनंच घेतल्या जात होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनं होणार आहेत अशी घोषणाही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना कोरोनचे नियम पाळणं बंधनकारक
परीक्षा जरी ऑफलाईन पद्धतीनं होणार असल्या तरी परीक्षांच्या दरम्यान कोरोनाचे नियम पाळूनच विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. तसंच शाळा आणि सेंटर्सकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ते नियम पाळले जाणार आहेत अशीही माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे
Leave a comment