अमेरिका,तैवान देशातील कंपन्यानी भारतासाठी केली निवड
कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर आधी प्रचंड मेहनत आणि करत असलेल्या कामाची आवड महत्वाची असते,लाथ मारिन तिथे पाणी काढीन ही जिद्द मनात ठेवून कुठलीही परिस्थिती असताना मागे न पाहता पुढे जाणे महत्वाचे असते,अशीच यशाची भरारी बीडच्या तरुण इंजिनिअर असणाऱ्या प्रकाश आत्माराम सुलाखे यांनी घेतली आहे,पॉलिटेक्निक शिक्षण घेतल्यानंतर अवघे 160 रुपये खिशात ठेऊन पुण्यात प्रवेश करत सुलाखे यांनी आधी 3 वर्ष एका कंपनीत नौकरी करत असतानाच स्वतःचे ,इलेक्ट्रॉनिक स्पेअर पार्ट बनवू लागले त्यास चांगली मागणी येऊ लागली यावेळी संबंधित क्षेत्रातील आणखी दोन मित्राची ओळख झाली,नाशिक येथील प्रशांत अशोकराव वाघ,आणि पुणे येथील स्व प्रशांत बाबासाहेब बुगे या दोन इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांची मैत्री झाली,पुढे छोट्या भांडवलावर त्यांनी 1997 साली व्ही रॅम सिस्टीम नावाची कंपनी सुरू
केली,उत्पादित मालाची मागणीही वाढू लागली,पुण्यात धायरी परिसरात असलेली ही कंपनी पुढे साइनव्हेव्ह इंजिनिअरिंग प्रा लि म्हणून 2006 साली ओळखू लागली,सी एन सी मधीन तयार होऊ लागल्या,राज्या बरोबरच इतर राज्यातही या मशीनची मागणी वाढली,2012 साली कँडमेक इंजिनिअरिंग ही दुसरी कंपनी स्थापन करण्यात आली पंधरा वर्षापासून पुणे येथील कासुर्डी औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीत इंजिनीअरिंग कॉलेज तसेच पॉलीटेक्निक संस्थांना लागणारे सीएनसी मशीन चे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले,2008 साली आय एस ओ मानांकन प्राप्त या कंपनीला अमेरिकेतील पॉकेट एन सी या कंपनीने संपूर्ण भारताचा सर्वे करून अधिकृत वितरक म्हणून नुकतीच नेमणूक केली आहे कॅड मॅक ही कंपनी छोट्या सीएनसी मशीन बनवते, दाग दागिने, डेंटल क्लिनिक साठी लागणाऱ्या मशीन संशोधन संस्थांना लागणाऱ्या मशीन आणि इतर छोटे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या मशीन या ठिकाणी तयार होत आहेत उत्तम दर्जा आणि बनवलेल्या खात्रीच्या मशीन असल्यामुळे डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड तैवान या कंपनीने सुद्धा संपूर्ण भारतभर रोबोट व ऑटोमेशन प्रॉडक्ट याकरता शैक्षणिक वितरक म्हणून कॅड मॅक कंपनीची निवड केली आहे अपुरी साधने अपुरी गुंतवणूक याकरता पर्याय म्हणून कॅडमेकने व्हर्च्युअल लॅब हा पर्याय भारतात राबवण्यासाठी रशियन कंपनी व्हर्टलॅब यांच्या बरोबर करार केलेला आहे बीड येथील इंजि प्रकाश सुलाखे नाशिक येथील प्रशांत वाघ आणि पुणे येथील स्व प्रशांत बुगे यांनी उभारलेल्या या उद्योगाची भरारी भारताबरोबरच आता परदेशातही गेली आहे सध्या प्रकाश सुलाखे यांच्या मार्गदर्शनाखाली या कंपनीचे कामकाज चालू आहे या कंपनीत एकूण 20 तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे
प्रकाश सुलाखे हे मूळचे चकलंबा ता गेवराई येथील रहिवासी असून लोकांक्षाचे संपादक प्रशांत सुलाखे यांचे छोटे बंधू आहेत
Leave a comment