मस्के यांच्यावर सर्व मान्यवरांचा कौतुकांचा वर्षाव
अटल निधी बँक सेवा देण्यातही अटल राहील
बीड । वार्ताहर
भाजपात कार्यकर्त्याची गुणवत्ता पाहीली जाते. कमी कालावधीत गुणवत्ता सिध्द करून राजेंद्र मस्के देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष बनले आहेत. त्यांना राजकारणात उज्वल भविष्य आहे, त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मनोकामना पुर्ण होतील, अशी कौतुकाची थाप मारत अटल या शब्दात मोठी नैतिक ताकत आहे. अटलजींच्या नावाने सुरू झालेली बँक सेवा देण्यातही अटल राहील, असा विश्वास भाजपाच्या राष्ट्रीय सविच पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
अटल निधी मल्टीपर्पज बँकेचे लोकार्पण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचा वाढदिवसानिमित्त बीड येथे कोविड योद्यांचा गौरव करण्यात आला. मठाधिपती महंत शिवाजी महाराज या कार्यक्रमास आ. लक्ष्मण पवार, माजी आ.राजेंद्र जगताप, अक्षय मुंदडा, आर.टी. देशमुख, आदीनाथराव नवले, अशोक हिंगे,निळकंठ चाटे,उषाताई मुंडे,जयश्रीताई मस्के,जयश्रीताई मुंडे,मोहनराव जगताप, विजयकुमार पालसिंगनकर, नवनाथ शिराळे, जयदत्त धस, जगदीश गुरखूदे,सुनील सुरवसे,रमेश चव्हाण,नितीन नाईकनवरे,ज्ञानेश्वर खांडे,जेष्ठ पत्रकार वसंत मुंडे,संतोष मानुरकर,विजय गोल्हार,गणेश बजगुडे, सुभाष धस, विक्रांत हजारी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. भाजपनेत्या पंकजा मुंडे यांच्या भाषणापुर्वी मनोगत व्यक्त करताना सर्वच वक्त्यांनी राजेंद्र मस्के आमदार बनावेत अशा आपल्या भाषणातून शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या काय बोलणार याची उत्सुकता लागली होती. दरम्यान पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्या भाजप सारख्या देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे जिल्हाध्यक्षपद हे खूप मोठे पद आहे. त्यांनी निष्ठेणे काम केले, पक्षासाठी योगदान दिले म्हणून ते कमी कालावधीत या पदावर पोचले. भाजप पक्ष प्रस्तापित नव्हे तर कार्याकर्त्यांच्या गुणवत्तेचे मोल जानणारा पक्ष आहे. सर्वसामान्य जनता आणि पक्षासाठी योगदान देणारे कार्यकर्ते मोठे झाले पाहीजेत. कार्यकर्ते मोठे झाले तरच नेते मोठे होतात. राजेंद्र मस्के यांनी काम करत रहावे, त्यांना भाजपात अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल, असा कौतुकाचा वर्षावच पंकजाताई मुंडे यांनी राजेंद्र मस्के यांच्यावर केला. त्या म्हणाल्या, मस्के हे प्रत्येक काम तन- मनाने करतात. अटल निधी मल्टीपर्पज बँक त्यांनी आज सुरू केली. या बँकेला मी शुभेच्छा देते. या बँकेच्या नावात अटल शब्द आहे. या शब्दात नैतिकतेची खूप मोठी ताकत आहे. यामुळे अटलजींच्या नावाने सुरू झालेली बँक सर्वसामान्य माणसाचे अर्थिक हीत जपेल. अटल शब्दाला कुठेही तडा जाणार नाही, याची काळजी राजेंद्र मस्के घेतील, असे त्या म्हणाल्या. अपघाताने राजकारणात आले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस अगोदर मुंडे साहेबांनी विधानसभा निवडणुक लढायची आहे, असे मला सांगीतले. साहेबांच्या दुर्दैवी अपघातानंतर त्यांच्यावर प्रेम करणार्या लाखो- करोडो लोकांची जिम्मेदारी येऊन पडली. या परिस्थितीत यापुढे साहेबांचे नाव अजरामर करण्यासाठी राजकारणात सक्रीय व्हायचे असा निर्णय घेतला. राजकारणात जय पराजय होत असतो. लोकनेते मुंडे साहेबांची वारसदार हे माझ्यासाठी सर्वात मोठे पद आहे. साहेबांच्या नावाचा विसर पडु द्यायचा नाही, त्यांचे प्रत्येक अधुरे स्वप्न पुर्ण करायचे, हे एकमेव ध्येय असल्याचे त्या म्हणाल्या.
पालक हा पालकच असतो, पालकमंत्री म्हणून काम करताना कधीही जात- धर्म आणि पक्ष पाहीला नाही. याच्या पलिकडे जावून विकासाची कामे केली. पालक शब्दाला न्याय देऊ शकले याचा अभीमान असल्याचे त्या शेवटी म्हणाल्या. यावेळी माजी आमदार राजेंद्र जगताप, आर.टी. देशमुख, अशोक हिंगे, संभाजी सुर्वे,मारोती तिपाले यांनी मनोगत व्यक्त केले. सार्याच वक्त्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आमदार बनावेत, त्यांना राजकारण आणि समाजकारणात मोठे यश मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावेळी कोरोना महामारीच्या कठीण काळात रूग्ण सेवा करणार्या कोविड योद्यांचा भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील कुटुंब प्रमुखांना ई-कार्ड वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास सर्व स्तरातील लोकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी भगवानराव केदार, रमाकांत मुंडे,विजय पालसिंगण कर, उषाताई मुंडे ,जयश्री ताई मुंडे, मीरा गांधलले डॉ.नेहरकर, गणेश दादा बजगुडे, नगरसेवक रमेश चव्हाण,, शिवसेनेने शहराध्यक्ष सुनील सुरवसे, भगीरथ बियाणी, अजय सवई,डॉ.लक्ष्मण जाधव, शांतिनाथ डोरले, हरीश खाडे, सुनील मिसाळ, छाया मिसाळ, संध्या राजपूत, शैलजा मुसळे, अनिता जाधव, लता बुंदेले, शीतल राजपूत, लता मस्के,संजीवनी राऊत,लता राऊत,मीराताई गांधले, कांता बांगर, प्रमोद रामदासी, विठ्ठल ठोकळ, शरद झोडगे, अमोल वडतीले, दिपक थोरात, पंकज धांडे, भगवानराव केदार, अनिरुद्ध शिंदे,शंकर देशमुख, सुधीर घुमरे, अनिल चांदणे, विलास बामणे, कपिल सौदा, डॉ सुरेश पिंपळे, भागवतराव परजणे, दीपक थोरात, दुशंत डोंगरे,शरद झोडगे,गणेश पुजारी,हरीश खाडे, पंकज धांडे, मनोज डरपे, प्रल्हाद धनवडे, मच्छिंद्र सानप, भीमराव मस्के, बंडू मस्के, युवराज मस्के, गणेश बजगुडे अक्षय शरद बडगे, महेश सावंत वसंत गुंदेकर, कचरू जाधव,सुरेश माने,बाळासाहेब गात,अजय ढाकणे, सोमनाथ मुंडे,पोपट रोहीटे, हावळे सर संग्राम बांगर,दिलीप डोंगर,रवी कळसाने,महावीर जाधव,बालासाहेब वायभट,भागवत खाकरे,वसंत गुंदेकर यांची उपस्थिती होती.
कोविड योद्यांना न्याय मिळालाच पाहीजे
कोरोना महामारीच्या कठीन काळात डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय यांनी मोठे योगदान दिले. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही सेवेची मोहीम उघडली. ज्या काळात नातेवाईक जवळ येत नव्हते, अशा वेळी तुटपुंज्या पगावरावर कोरोना रूग्णांची सेवा करणार्या कोविड योद्यांना अगामी नोकर भरतीत प्राधान्य मिळायला हवे. नोकरभरतीचे जरी काही नियम असले तरी कोविड योद्यांसाठी राखीव जागा, मार्कात सुट सरकारने द्यावी. या प्रश्नी मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. कोरोना योद्यांचा सन्मान सोडा, निवेदन द्यायला आले तर त्यांच्यावर लाठीहल्ला केला. याचा त्यावेळी आणि आजही जाहीर निषेध व्यक्त करत असल्याचे यावेळी पंकजाताई मुंडे म्हणाल्या.
Leave a comment