बीड । वार्ताहर
केज तालुक्यातील रामेश्वरवाडी येथील दुकानदार राशनधारकांना मोफतचे धान्य विकत आणि विकतचे धान्य जादा दराने विकत असल्याने सदरील दुकान जिल्हाधिकारी यांनी तक्रार मिळतातच तडकाफडकी निलंबित करुन राशनधारकांना न्याय दिला. जिल्ह्यात अनेक दुकानदार असाच करत असताना अधिकारी मात्र बघ्याची भुमिका घेत असल्याचेही चित्र दिसून येत आहे, याकडे कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित होत आहे.
रामेश्वरवाडी येथील गरीब नागरिकांना दुकानदार बंडू आंधळे धान्य देण्यास टाळाटाळ करीत होता, तसेच दुकानावर आलेले मोफत धान्य विकत दिले, विकतचे धान्यही जादा दराने विकल्या जात असल्याची तक्रार हनुमंत माळीसह इतरांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. यानंतर जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती गठीत केली. या समिती चौकशी केली असता दुकानात अने त्रुटी दिसून आल्या, भावफलक नसणे, शिल्लक कोठा फलकावर न दर्शविणे, तक्रार पुस्तिका नसणे, भेट पुस्तिका नसणे यासह इतर त्रुटी आढळून आल्याचे चौकशी समितीने जिल्हधिकारी यांना दिलेल्या अहवालात स्पष्ट केले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना अहवालानुसार तात्काळ निर्णय घेऊन रामेश्वरवाडी येथील राशन दुकान तडकाफडकी निलंबित केले असून या निर्णयाने राशनदुकानदारात खळबळ उडाली आहे
Leave a comment