नवे 176 रुग्ण तर 120 कोरोनामुक्त
बीड । वार्ताहर
कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी जिल्ह्यात मृत्यू रोखण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर कायम आहे. शुक्रवारी (दि.25) जिल्ह्यात चोवीस तासात 8 व जुने 3 अशा एकूण 11 मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. तसेच 176 नवे रुग्ण निष्पन्न झाले तर 120 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
गुरुवारी 3 हजार 786 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल शुक्रवारी दुपारी प्राप्त झाले. यात 176 पॉझिटिव्ह तर 3 हजार 610 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 3, आष्टी 63, बीड 13, धारुर 3, गेवराई 24, केज 14, माजलगाव 6, परळी 4, पाटोदा 28, शिरुर 15 व वडवणी तालुक्यातील 3 जणांचा समावेश आहे.
एकूण बाधितांचा आकडा 91 हजार 267 इतका झाला असून यापैकी 87 हजार 547 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान 24 तासांत 8 व जुने 3 अशा अकरा मृत्यूची नोंद झाली. यात शिवाजीनगर माजलगाव येथील 40 पुरुष, भोगलवाडी (ता.धारुर) येथील 70 वर्षीय पुरुष, बर्दापूर (ता.अंबाजोगाई) येथील 90 वर्षीय महिला, नागझरी (ता.बीड) 42 वर्षीय महिला, खोकळवाडी (ता.आष्टी) येथील 68 वर्षीय पुरुष, देविनिमगाव (ता.आष्टी) येथील 61 वर्षीय महिला, शहाजानपूर (ता.माजलगाव) येथील 74 वर्षीय महिला व कामखेडा (ता.बीड) येथील 45 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.आता एकूण बळींचा आकडा दोन हजार 478 इतका झाला आहे. सध्या जिल्ह्यात 1 हजार 243 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
Leave a comment