खरडगव्हाण मध्ये तीस जण बाधित
बाधित रुग्ण बिनबोभाटपणे गावात फिरू लागले
आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मधल्या काळात कमी झाली होती परंतु निर्बंध शिथिल होताच रुग्ण संख्या वाढली असून शुक्रवारी एकाच दिवशी तालुक्यात ६३ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील खरडगव्हाण या एकाच गावात तीस रुग्ण आढळले आहेत.
आष्टी तालुक्यातील नागरिक शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत नसल्याने रुग्ण संख्या वाढत असून गर्दीमुळे रुग्ण संख्या झपाट्याने पसरत आहे याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. तालुक्यातील खरडगव्हाणया गावांमध्ये मागील तीन दिवसात तब्बल 30 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या 30 रुग्णांपैकी 19 रुग्ण हे आष्टी येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत तर अकरा रुग्ण गावांमध्येच ग्रहविलगीकरण कक्षात आहेत मात्र आष्टीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन मोरे यांनी दिनांक 24 जून रोजी या गृह विलगीकरण कक्षाला भेट दिली असता त्या ठिकाणी फक्त एक रुग्ण आढळून आला तर उर्वरित दहा कोरोना बाधित रुग्ण गावांमध्ये बिनबोभाटपणे फिरत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एकच हातपंप असल्याने व बाधित रुग्ण गावात बिनबोभाट पणे फिरत असल्याने इतरांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी आरोग्य विभागाने खरडगव्हाण गावातील सरपंच व ग्रामसेवक यांना नोटीस बजावली असून अनधिकृतपणे दहा बाधित रुग्ण फिरत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
Leave a comment