बीड  । वार्ताहर

येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेतील बाडी फिटर बी.एन.मस्के यांचे दि .1 9 एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . त्यांच्या या अचानक जाण्याने एस.टी.च्या तुटपुंज्या पगारीवर गुजराण करणारे कै . मस्के यांचे कुंटुब या महामारीत पडले . त्यामुळे त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा भार येथील कर्मचार्‍यांनी आपल्या खांद्यावर घेतल आहे . यामुळे कर्मचार्‍यांनी समाजासमोर आर्दश निर्माण केला आहे.

कै.मस्के यांच्या कुंटुबाची हलाखीची परिस्थिती असल्याने या महागाईत मुलांच्या शिक्षणाचा यक्ष प्रश्न उभा राहीला . तेव्हा त्यांचा मुलगा चि.सत्यजित मस्के याच्या पुढील शिक्षणाचा भार उचलण्याचा निर्णय कार्यशाळेतील 150 ते 200 यांत्रीक कामगारांनी घेतला . चि.सत्यजित या वर्षी इयत्ता 11 असून त्याची नीट साठीच्या ऑनलाइन शिकवणीची 2 वर्षाची फिस कार्यशाळेतील कर्मचार्‍यांनी यथायोग्य जमा करून भरली असून चि.सत्यजितला ऑनलाइन ट्युशन व्यवस्थित करण्यासाठी चांगला मोबाईल पण घेऊन दिला . या सत्कार्यात कार्यशाळेतील कर्मचारी आय.आर.कदम , रेवण थोरात , सचिन खताळ , देवराज यमपुरे , राजाराम मुरकुटे व इतर सांनी विशेष योगदान देऊन परिश्रम घेतले . तसेच पाहीले तर एस.टी.कर्मचारी आपल्या अडचणीतील सहकार्याला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात . आजच्या या कोरोना महामारीच्या काळात माणूस माणसापासून दूर जात आहे तर एस.टी.कर्मचार्‍यांनी मयत सहकार्याच्या कुंटुबाला मदतीचा हात देऊन एक समाजात चांगला आदर्श निर्माण केला आहे .

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.