जिल्ह्यात 36 मृत्यूची नोंद; नव्या 975 रुग्णांची भर
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात बुधवारी (दि.19) कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढल्याने मोठा दिलासा मिळाला. तसेच जुन्या, नव्या मिळून 36 मृत्यूंची नोंद झाली. नवे 975 रुग्ण आढळून आले व 1049 जण कोरोनामुक्त झाले.
मंगळवारी जिल्ह्यात 4 हजार 68 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल बुधवारी दुपारी प्राप्त झाले. यात 3 हजार 93 अहवाल निगेटिव्ह आले तर 975 अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 327 अंबाजोगाई 79, आष्टी 94, धारुर 56, गेवराई 70, केज 108 ,माजलगाव 53, परळी 30, पाटोदा 88, शिरुर 49 आणि वडवणी तालुक्यातील 21 जणांचा समावेश आहे.
मंगळवारी जुन्या 19 व 24 तासांतील 17 अशा एकूण 36 मृत्यूंची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. आता एकूण बाधितांचा आकडा 77 हजार 701 इतका झाला असून यापैकी 69 हजार 989 जण कोरोनामुक्त झाले आहेत.दरम्यान कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1567 झाली आहे. आता 6 हजार 120 जणांवर उपचार सुुरु असल्याची माहिती सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के. पिंगळे यांनी दिली.
Leave a comment