नवे 1150 रुग्ण तर 1219 जणांना सुटी
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाने शनिवारी (दि.15) गत चोवीस तासातील 18 तर जुन्या 16 अशा एकूण 34 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. तसेच शनिवारी दिवसभरात 1150 नवे रुग्ण आढळले तर 1219 कोरोनामुक्त झाले.
शुक्रवारी (दि.13) 4447 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. याचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. यात 3297 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 1150 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळाले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 80, आष्टी 194, बीड 279, धारुर 69, गेवराई 97, केज 103, माजलगाव 100,परळी 38, पाटोदा 67, शिरुर 92, वडवणी 31 जणांचा समावेश आहे. एकूण बाधितांचा आकडा 73 हजार 525 इतका झाला आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 65 हजार 486 इतकी झाली आहे. जुन्या 16 तर नवीन 24 तासांत मृत्युमुखी पडलेल्या 18 जणांची नोंद नोंद आरोग्य विभागाकडे झाली. त्यामुळे बळींचा आकडा 1378 इतका झाला आहे. सध्या 6 हजार 661 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के. पिंगळे यांनी दिली.दरम्यान आरोग्य विभागातर्फे रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांची धरपकड करुन अँटीजन चाचणी केली जात आहे. बीडमध्ये शनिवारी (दि.15) 181 जणांची चाचणी करण्यात आली. यापैकी 25 जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
Leave a comment