लसीकरणादरम्यान सोशल डिस्टन्सचा फज्जा
पाटोदा । आजीज शेख
ग्रामिण रुग्णालय पाटोदा येथे मोठ्याप्रमाणात लसीकरणासाठी होणा-या गर्दीमुळे हॉटस्पॉट बनले असून लसीकरणासाठी येणारे ग्रामस्थ कोरोना सोबत घेऊन जातात की काय ? असा प्रश्न उपस्थित झाला असून सोशल डिस्टसिंगचे नियम पायदळी तुडवल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली असून ऑनलाइन रजिस्ट्रेशन करतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तारीख बुक होतच नाही, कधी चालु होतंय अन् बंद हे प्रशासनालाच माहीत. आत्ताची ग्रामीण रूग्णालयातील परिस्थिती ज्याचा वशीला तोच काशीला नाहीतर बसला वेशीला ऑनलाईन लस कधी बुकींग सुरू होती त्याची वेळ निच्छित नाही, लस बुकींगची वेळ निच्छीत करून दयावी अशी सामान्य जनतेकडुन वैदयकीय आधिकारी आरोग्य विभाग पाटोदा यांच्याकडे मागणी केली जात आहे. लस ऑनलाईन बुकींग कधी संपती ती कोणालाही माहीती होत नाही. लस घेण्यासाठी खुप गर्दी होत आहे गर्दी टाळण्यासाठी कसलेही प्रकारचे नियोजन नाही. कोरोना होऊ नये, म्हणुन लस घेण्यासाठी आलेल्या जनतेलाच कसल्याही प्रकारचे नियोजन नसल्याने आलेल्या जनतेमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढन्याची भीती निर्मान झाली आहे.
ढिसाळ नियोजनामुळे लोकं मोठ्याप्रमाणात जमा होताना दिसत आहे. नागरिक लसीकरण नांवनोंदणीसाठी गर्दी करत आहेत. अपुरे कर्मचारी असल्या कारणाने ढीसाळ नियोजन दिसत असून आधिकारी-कर्मचार्यांचा लसीकरण नोंदणीसाठी जमा झालेल्या नागरिकांना सोशल डीस्टसिंगचे नियम सांगुनही उपयोग होताना दिसत नाही, त्यातच कर्मचार्यांनी आग्रह धरलाच तर नागरीक हमरीतुमरीवर येताना दिसतात. त्यामुळे ते सुद्धा जास्त समजावण्याच्या भानगडीत पडतांना दिसत नाहीत.त्यामुळेच जास्त गर्दी झाली तर संसर्गाचा धोका जास्त होईल.लसीकरणासाठी येणारांची गर्दी होऊ नये तसेच आरोग्य कर्मचा-यांवरील ताण कमी व्हावा म्हणुन ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याचे शासनाचे आदेश आहेत परंतु ऑनलाइन रजिस्ट्रेशन ग्राह्य धरले जात नसून प्रत्यक्ष नावनोंदणी करून टोकन घेऊन जावे लागत आहे, एका व्यक्तिला 4 जणांची नोंदणी करण्याची मुभा आहे. त्यामुळे ऑनलाइन रजिस्ट्रेशनचा काहीच उपयोग नाही.अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
Leave a comment