बीडसाठी उभारणार 2 कोटींचा ऑक्सीजन प्लान्ट- एकनाथ शिंदे

बीड । वार्ताहर

सध्या शहरी भागासह ग्रामीण भागात सुध्दा कोरोनामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे  कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्व जनतेने कोरोना विषयक नियम पाळणे, मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदि अत्यंत आवश्यक आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड सारख्या ग्रामीण भागात स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने 500 बेडचे सुसज्ज असे कोविड सेंटर उभारुन ग्रामीण भागातील जनतेचे प्राण वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न आदर्शवत असाच आहे. शहरी भागात नसेल असे कोविड सेंटर उभारुन कुंडलिक खांडे यांनी उभारले आहे. बीडसाठी ऑक्सीजन प्लॅन्ट उभारणीसाठी नगर विकास खात्यातून 2 कोटी रुपयांची तातडीची तरतुद करत असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.तसेच जिल्हा रुग्णालयाला 25 ऑक्सीजन कान्स्ट्रेटर आणि एक अत्याधुनिक रुग्णवाहिका दिली असल्याची घोषणाही त्यांनी केली.या प्रसंगी माध्यमिक आश्रमशाळेची इमारत कोविड सेंटरसाठी देणार्या दिनेश पवार यांचा विशेष उल्लेख करत दिनेश पवार यांनी खर्‍याअर्थाने सामाजिक उत्तरदायित्व निभावले आहे असे प्रतिपादन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने बीड तालूक्यातील अंथरवणपिंप्री  तांडा  येथील दिनेश पवार यांच्या सद्गुरु बंजारा सेवा संचलित माध्यमिक आश्रमशाळा येथे सर्व सोयींनी अद्ययावत असणारे 500 बेडचे सुसज्ज असे स्व.बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर उभारले असून शुक्रवार दि.7 मे रोजी दुपारी या कोविड सेंटरचे लोकार्पण  नगर विकासमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  संपन्न झाले. या प्रसंगी शिवसेना सचिव मिलिंदजी नार्वेकर,फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे पाटील, शिवसेने नेते चंद्रकांत खैरे,माजी मंत्री अर्जुनराव खोतकर,माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, माजी मंत्री बदामराव पंडित,माजी मंत्री सुरेश नवले, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर,सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे,किसानसेना प्रमुख परमेश्वर सातपुते,महिला आघाडी जिल्हाप्रमुख संगिता चव्हाण, नगरसेवक भीमराव वाघचौरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कमी पडत असून ग्रामीण भागातही  मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधीत रुग्ण आढळत असल्याने जनतेच्या आरोग्य हितासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या संकल्पनेतून बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने बीड शहरापासून अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर असणार्या अंथरवणपिंप्री  तांडा  येथील दिनेश पवार यांच्या सद्गुरु बंजारा सेवा संचलित माध्यमिक आश्रमशाळा येथे सर्व सोयींनी अद्ययावत असणारे 500 बेडचे सुसज्ज असे स्व.बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर उभारण्यात आले असून याचा लोकार्पण सोहळा नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. या कोविड सेंटरमध्ये महिला रुग्णांसाठी वेगळा कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच येथील रुग्णांना दोन वेळेस जेवण,नाष्टा,आयुर्वेदिक काढाही देण्यात येणार आहे.

स्व.बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटरच्या लोकार्पण सोहळ्या  प्रसंगी बोलतांना ना.एकनाथ शिंदे म्हणाले की, सध्याचे कोरोना संकट हे भीषण असून नागरिकांनी  कोविड संदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शासनाची आरोग्य यंत्रणा सर्व ताकदीने या संकटाशी लढत आहे. बीडच्या ग्रामीण जनतेला इंजेक्शन आणि ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करत आहोत. बीडच्या ग्रामीण भागातील जनतेसाठी 500 बेडचे कोविड सेंटर सुरु करुन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी आदर्शवत आणि शिवसेनाप्रमुखांच्या  विचारांना अनुसरुन असे  कार्य केले आहे. शहरी भागाला लाजवेल असे कोविड सेंटर सुरु केल्याबद्दल मी जिल्हाप्रमुख खांडे यांचे अभिनंदन करतो. बीड जिल्ह्याला कोणत्याही औषधांची इंजेक्शन,ऑक्सीजन सिलेंडरची कमतरता भासू देणार नाही. कुंडलिक खांडे यांनी जनतेच्या हितासाठी केलेल्या प्रत्येक मागणीची पुर्तता करण्यात येईल. तसेच नगर विकास खात्याकडून ऑक्सीजन प्लान्टसाठी 2 कोटीचा निधी तात्काळ देत आहोत.तसेच जिल्हा रुग्णालयाला 25 ऑक्सीजन कान्स्ट्रेटर आणि एक अत्याधुनिक रुग्णवाहिका दिली असल्याची घोषणाही त्यांनी केली. नगर पालिकेला विद्युत दाहिनी साठी निधी देणार आहोत असेही नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे म्हणाले. या प्रसंगी दिनेश पवार यांनी आश्रमशाळेची इमारत कोविड सेंटरसाठी उपलब्ध केल्याबद्दल ना.एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.

या लोकार्पण सोहळ्यास शिवसेनेचे पदाधिकारी माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, जिल्हा समन्वयक बप्पसाहेब घुगे, जयसिंगमामा चुंगडे, जिल्हा सचिव वैजीनाथ तांदळे, सहसचिव मशरु पठाण, जिल्हा संघटक नितीन धांडे, रतन गुजर,उपजिल्हाप्रमुख आशिष मस्के, भाऊसाहेब लटपटे,  सुशिल पिंगळे, तालूका प्रमुख गोरख सिंघन,कालिदास नवले, कुमार शेळके, किरण चव्हाण, राहुल चौरे, शहर प्रमुख सुनिल सुरवसे,  सिनूभाऊ बेदरे, नगरसेवक रामसिंग टाक,बाळासाहेब गुंजाळ, शुभम धुत,महिला आघाडीच्या फरजाना शेख, सुमनताई गोरे, अलकाताई डावकर, उज्ज्वला भोपळे, संगिता वाघमारे, रेखा वाघमारे, ललिता आडाणे, तालूका संघटक नंदु जोगदंड, शेख रशिद,तालूका समन्वयक अर्जुन नलावडे, रमेश तांबारे,कल्याण कवचट, हनुमान पांडे, शेख कामरान,सखाराम देवकर,आबा घोडके, संतोष घुमरे, संजय उगले, माजी तालूकाप्रमुख विनायक मुळे, अविनाश पुजारी, राहुल साळुंके, साहिल देशमुख, लहू खांडे, कचरु जाधव, सिध्दार्थ  ढोकणे, सुदर्शन मोरे यांच्यासह जिल्हा शिवसेनेचे आजी,माजी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.  

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.