आरोग्य विभागाच देतोय कोरोनाला निमंत्रण ; जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज !
शिरूर कासार / बाळकृष्ण मंगरुळकर
शिरूर कासार शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वय वर्ष १८ ते ४४ व ४५ वर्षावरील नागरीकांची मोठ्या प्रमाणावर शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्र समोर गुरुवारी (दि.६) रोजी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती परंतु या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी कुठलीही सक्षम यंत्रणा आरोग्य विभागाकडे नसल्याचे दिसून आले तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांना सकाळी साडेसात वाजल्यापासूनच ताटकळत उन्हातानात उभे रहावे लागले तरीही आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसले कुठलाही योग्य कार्यक्रम आरोग्य विभागाकडे नसल्यामुळे सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे व येणाऱ्या नागरिकाना सॅनेटाइझर , पिण्याचे पाणी तसेच कुठलेही सामाजिक अंतराचे भान न ठेवता येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली तरी निमूटपणे आरोग्य विभागाचे कर्मचारी बघत होते यावरून असे निदर्शनात येते की एक प्रकारे आरोग्य विभागच कोरोनाला निमंत्रण देत होता असे स्पष्ट चित्र जाणवत होते.
एकीकडे शासन कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मोठमोठ्या उपायोजना राबवत आहे गर्दी करू नका हे वारंवार सांगत असतानाही आरोग्य विभागासमोरच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी असतानाही एक जबाबदार व कर्तव्यदक्ष तालुका आरोग्य अधिकारी खुर्चीला चिटकून बसले की काय ? असा सवाल उपस्थित नागरिकांनी केला आहे कोविडची लस घेण्यासाठी नागरिकांची व वाहनांची मोठी गर्दी यावेळी दिसून आली.
तालुका आरोग्य अधिकारी यांना फोनची अलर्जी?
-
कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असणारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक गवळी यांना वारंवार फोन करूनही फोन उचलत नसल्याचे दिसून आले कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना ही बाब शोभनिय नसून जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी फोन उचण्याचे कष्ट तालुका आरोग्य अधिकारी यांनी घ्यावे व समस्याचे निदान करावे एवढीच अपेक्षा.
Leave a comment