बीड | वार्ताहर
नागरिकांनी सर्दी ताप, खोकला असल्यास ताबडतोब जवळच्या डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावे ,अंगावर दुखणे काढू नका असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले
सध्या पूर्ण जगामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे,अनेक जवळचे लोक या आजरामुळे मृत्युमुखी पडले,
सरकारने घालून दिलेल्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही,त्यामुळे या आजाराचा प्रसार झपाट्याने होत आहे,लॉकडावूनच्या काळात लोकांनी घराबाहेर पडू नये,मला काही होत नाही या फुकटच्या आत्मविश्वासाने स्वतः व घरातील लोकही आजारी पडत आहेत एका बरोबर संपूर्ण कुटुंबच परेशान होत आहे
नॉव्हेल करोनाव्हायरसने धुमाकूळ घातल्याने कोव्हिड-19 आणि नंतर सुधारीत विषाणूने माणसाचे जगणे मुश्कील करुन टाकले आहे.नाकावाटे पसरणाऱ्या या संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणून चेहऱ्याला मास्क लावणे आणि नाक-तोंड झाकूनच बाहेर पडणे क्रमप्राप्त झाले आहे,कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. दिवसेंदिवस करोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. या काळात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.त्यामुळे नागरिकांनी हे दुखणे अंगावर न काढता,दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे आवाहनही माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे
देशात कोरोनाने पुन्हा थैमान मांडला आहे आणि दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. नवीन स्ट्रेन आल्याने लक्षणं देखील बदलली आहेत.
सर्दि, खोकल्या पासून सुरूवात,डोकेदुखी,ताप
घशात खवखवणे,शिंका येणे, नाकातून,पाणी,येणे,अशक्तपणा, थकवा,श्वास घेण्यास त्रास होणे/अडचण होणे,निमोनिया,फुफ्फुसांवर सुज आदि लक्षणे वाटत असतील तर तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करून घ्यावी,आता ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे सावधानता आणि सुरक्षितता हेच महत्वाचे आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे आणि आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे कळकळीचे आवाहन माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे
Leave a comment